नगराध्यक्षांकडून पाहणी : कॉर्निया वनस्पती काढणार; निर्माल्य टाकण्यासाठी घंटागाडी राहणारगडचिरोली : गडचिरोली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या तलावाला कॉर्निया वनस्पतीने विळखा घातला आहे. या तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन दरवर्षी केले जाते. या विसर्जन कामात अडचण निर्माण होऊ नये म्हणून मंगळवारी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक (यादव) यांनी तलाव परिसराची पाहणी केली व हा तलाव स्वच्छ करण्याचे आदेश नगर परिषद प्रशासनाला दिले.यावेळी नगराध्यक्षांसमावेत आरोग्य विभागाच्या स्वच्छता पर्यवेक्षक प्रणाली दुधबळे, आरोग्य निरिक्षक संतोषवार, विद्युत विभागाचे सुनील घोसे, कार्यालयीन जमादार व सफाई कर्मचारी तसेच रामकिरीत यादव आदी उपस्थित होते. नागरिकांनी तलावाच्या पाण्यात निर्माल्य फेकू नये याकरिता विसर्जन काळात दोन घंटागाड्या २४ तास तलाव परिसरात उभ्या ठेवण्याचे निर्देश नगराध्यक्ष धात्रक यांनी प्रशासनाला दिले. तसेच तलाव परिसरात विद्युत व्यवस्थाही करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या. विसर्जनाच्या वेळी अनेक जण तलावात उतरतात. बुडून जाण्याची घटना घडू नये, याकरिता दोन पट्टीचे पोहणारे व तीन मजूर तलाव परिसरात उपस्थित ठेवण्याबाबतही नगराध्यक्षांनी सूचना केली. (जिल्हा प्रतिनिधी)
विसर्जनापूर्वी तलावाची होणार स्वच्छता
By admin | Updated: September 7, 2016 02:09 IST