शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गावात स्वच्छता मात्र रस्ते हागणदारीयुक्त

By admin | Updated: December 4, 2014 23:09 IST

परिसरातील अस्वच्छतेचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. स्वच्छतेमुळे रोगराई पासून सर्वसामान्यांना दूर ठेवता येईल़ यासाठी केंद्र शासनाने वैयक्तिक स्वच्छतेबरोबर परिसर स्वच्छतेकरिता

देसाईगंज : परिसरातील अस्वच्छतेचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. स्वच्छतेमुळे रोगराई पासून सर्वसामान्यांना दूर ठेवता येईल़ यासाठी केंद्र शासनाने वैयक्तिक स्वच्छतेबरोबर परिसर स्वच्छतेकरिता संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविला. काही दिवसांकरिता गावे स्वच्छ झाली़ मात्र जन्मजात शौचासाठी गावाबाहेर जाण्याच्या सवयीमुळे गावाबाहेरील रस्ते मात्र अजूनही हागणदारी युक्त आहेत. ग्रामपंचायतीनी कठोर दंडात्मक कारवाई केल्याशिवाय जन्मजात सवय सुटणार नाही, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. स्वच्छ भारत अभियानामुळे गावागावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़ यात अनेकांनी सहभाग घेऊन हातात झाडू घेतला. व स्वच्छतेविषयी जनजागृती केली़ याची फलश्रुती म्हणून बहुतांश गावात काही काळाकरिता मोठ्या अभिमानाने ग्राम स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गावातील कचरा नियोजित ठिकाणी जमा करून गावाबाहेर फेकण्यात आला़ मात्र हे सर्व करीत असतांना गावा बाहेरील रस्ते मात्र पूर्णपणे हागणदारी युक्त होते़ या कालावधीत कधी नव्हे एवढी दुर्दशा या रस्त्याची झाली आहे़ भारतीयांना मिळालेला अस्वच्छतेचा शाप या ठिकाणी देखील डोके वर काढून मानवी इच्छेवर जड झाला असेच म्हणावे लागेल़ ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिक शौचालयाचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. सदर चित्र ग्रामीण भागात नेहमीचेच झाले आहे़ शहरापासून तर ग्रामीण भागात मोठमोठ्यांचे अनुकरण करण्याचे वेड सर्वसामान्याना लागले आहे़ मात्र अनुकरण करतांना चांगल्या विचारांचे अनुकरण कोणीही करीत नसल्याचेच समाजात दिसत आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत करण्याकरिता हातात झाडू घेतला़ त्यानुसार प्रत्येकानी स्वच्छतेविषयी जागृत राहावे हा विचार समोर आला़ मात्र त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे सोडून फोटो सेशन करण्यात सर्वसामान्यांचा वेळ गेला. गावे स्वच्छ करीत असतांना गावाबाहेरील रस्ते सुध्दा स्वच्छ करावयाला पाहिजे़ रस्ते म्हणजे गावाचे दर्पण असल्याचे बोलले जाते़ मात्र गाव स्वच्छतेच्या हुरूपात बाहेरील रस्त्यांकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही़ हागणदारीच्या उच्चाटनाकरिता ग्रामपंचायतींनी कठोर पावले उचलावयास पाहिजे़ मात्र जन्मजात सवयीमुळे ग्रामवासीयांवर कारवाई करण्यास ग्रामपंचायती उदासीन आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने हागणदारीमुक्त गाव मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी. संपूर्ण स्वच्छतेकरिता सर्वसामान्यांच्या मानसिकतेमध्ये अमूलाग्र बदल घडविणे आवश्यक आहे़ मात्र सध्याचे चित्र पाहता सध्यातरी ते शक्य नाही असे पर्यावरणवाद्यांचे मत आहे़ याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामपंचायतने कठोर पावले उचलावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)