शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुलचेरा शहरात स्वच्छतेची ऐसीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:14 IST

स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या भोंगळ व बेजबाबदार कारभारामुळे मुलचेरा नगर पंचायतीच्या सर्व १७ ही वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या गंभीर समस्येकडे नगर पंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देस्वच्छतेच्या कामाकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष : सप्टेंबरपासून घणकचरा व्यवस्थापनाची कामे बंद

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या भोंगळ व बेजबाबदार कारभारामुळे मुलचेरा नगर पंचायतीच्या सर्व १७ ही वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या गंभीर समस्येकडे नगर पंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.तीन वर्षांपूर्वी मुलचेरा ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा मिळाला. त्यावेळी मुलचेराच्या विकासाला गती मिळेल, अशी आशा नागरिकांमध्ये होती. मात्र ग्रामपंचायतपेक्षाही वाईट अवस्था नगर पंचायतीच्या कार्यकाळात शहराची झाल्याचे दिसून येत आहे.नगर पंचायतीला स्थायी स्वरूपाचा मुख्याधिकारी अद्यापही मिळालेला नाही. सध्या नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार येथील नायब तहसीलदार समशेर खा पठाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मुलचेरा नगर पंचायतीअंतर्गत १४ व्या वित्त आयोगामधून शहरातील सर्व वॉर्डात घनकचरा व्यवस्थापनाची कामे हाती घेण्यात आली. मात्र ही कामे सप्टेंबर २०१८ पासून पूर्णत: बंद आहेत. परिणामी शहरातील सर्वच १७ वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वॉर्डातील नाल्यांची साफसफाई केली जात नाही. राणी दुर्गावती नगरात वॉर्डक क्र.६ मध्ये नाल्यांमध्ये सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. नगर पंचायतीची स्थापना होऊन साडेतीन वर्ष उलटली. मात्र शहरात अद्यापही नगर पंचायतीच्या वतीने डम्पिंग यॉर्ड तयार करण्यात आले नाही. येथील मामा तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम थंडबस्त्यात आहे. परिणामी स्वच्छतेअभावी तलावात दुर्गंधी पसरली आहे. येथील मच्छी मार्केट हटविण्याच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. घणकचरा व्यवस्थापन कामाचे आदेश एप्रिल २०१८ मध्ये संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले.संबंधित कंत्राटदाराने प्रत्यक्षात जून ते आॅगस्ट २०१८ या तीन महिन्यात स्वच्छतेचे काम केले. मात्र त्यानंतर स्वच्छता व कचरा उचलण्याचे काम पूर्णत: बंद आहे.शहरातील नाली स्वच्छतेचे कंत्राट झाल्यानंतर नगर पंचायतीने सुधारित दर लागू केले. कमी दरामध्ये कंत्राटदार कामे करीत नसल्यामुळे स्वच्छतेचे काम सप्टेंबर २०१८ पासून बंद आहे. आता नगर पंचायतीची सर्वसाधारण सभा असल्याने या सभेत पदाधिकारी कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करण्याबाबत निर्णय घेतील.- समशेर खा पठाण, प्रभारी मुख्याधिकारी, नगर पंचायत, मुलचेरा

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान