गडचिरोली : जिल्ह्यात विविध शाळा, गावकरी व अनेक सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने गावागावात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. कै. महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चातगाव - येथील कै. महेश सावकार पोेरड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात सोमवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य टी. के. बोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून डब्ल्यू. एस. तडसे, नरेंद्र ढोले आदींसह शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी इयत्ता ८ ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शाळावर्गखोली, शालेय परिसर व प्रवेशद्वारापर्यंतची स्वच्छता केली. दरम्यान शिक्षक व विद्यार्थ्यांनी गावात फेरी काढून गावामध्येही स्वच्छता अभियान राबविले. कै. महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावातील प्रत्येक वार्डात स्वच्छता अभियान मोहीम राबवून सर्व गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. शाळेच्या सभागृहात स्वच्छता अभियान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्राचार्य टी. के. बोरकर यांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी परिसरात स्वच्छता ठेवणे अतिशय महत्वाचे आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व्ही. जी. मामीडपल्लीवार यांनी केले. मारकबोडी - अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ, गडचिरोली जिल्हा सर्वाेदय मंडळ व डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर गावातील मुख्य चौकात समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रामटेके होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शिवनाथ कुंभारे, डॉ. मुरलीधर बद्दलवार, पंडीतराव पुडके, प्रा. देवानंद कांबडी, देवराव भोगेवार, डॉ. रायपूरे, विलास निंबोरकर आदी उपस्थित होते.
कृतीतून दिला स्वच्छतेचा संदेश
By admin | Updated: October 15, 2014 23:18 IST