शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

रबी हंगामातील पिकावरील कीड रोगाचे शास्त्रीय निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2016 01:32 IST

क्रॉप्साप प्रकल्प सन २०१५-१६ अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने हरभरा व तूर पिकावरील किड रोगाच्या निरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

हरभरा व तूर पिकाची पाहणी : गुरवळा, मारोडा, हिरापूर भागात दौरागडचिरोली : क्रॉप्साप प्रकल्प सन २०१५-१६ अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने हरभरा व तूर पिकावरील किड रोगाच्या निरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने गडचिरोलीचे उपविभागीय कृषी अधिकारी एम. के. सोटक्के व प्रकल्प सनियंत्रक दिशेन पानसे यांनी शुक्रवारी गुरवळा, मारोडा, राखी, हिरापूर आदी भागात दौरा करून हरभरा व तूर पिकाची पाहणी केली. किड रोगाचे शास्त्रीय निरीक्षणही केले. भात पिकानंतर रबी हंगामात गडचिरोली उपविभागात तूर व हरभरा पिकाकरिता क्रॉप्साप प्रकल्प कायम ठेवण्यात आला आहे. त्यानुसार एका सर्वेक्षक स्काऊटच्या मार्फतीने सर्वेक्षण व नियंत्रणाचे काम सुरू आहे. याशिवाय कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किड रोगावरील उपाययोजना सूचविल्या जात आहेत. गडचिरोली उपविभागाच्या क्षेत्रात किड रोगाबाबत निरीक्षण व सनियंत्रण सुरू असून मार्च २०१६ पर्यंत क्रॉप्साप या प्रकल्पाचा अहवाल पुस्तिकेसह पूर्ण करण्यात येईल, असे क्रॉप्साप प्रकल्पाचे सनियंत्रक दिनेश पानसे यांनी सांगितले. यापूर्वी क्रॉप्साप प्रकल्पाअंतर्गत कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धान पिकाची पाहणी करून रोगावर उपाययोजना सूचविल्या होत्या. पिकांवर विविध रोगाचा आढळला प्रादुर्भावकृषी अधिकारी व प्रकल्प सनियंत्रकाच्या पाहणीत गुरवळा, मारोडा, राखी व हिरापूर भागातील हरभरा व तूर पिकांवर विविध रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. हरभरा पिकावर घाटेअळी, देठ कुरतडणारी अळी, लष्कर अळी, कोरडी मर याचा प्रादुर्भाव दिसून आला. वातावरणातील लक्षणीय बदल, उशिरा पेरणी, अन्नद्रव्यांचा अपुरा व अयोग्य वापर यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. हरभरा व तूर पिकावरील रोगाचे निर्मूलन करण्यासाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशक व दोन टक्के युरियाची फवारणी पिकांवर करावी, अशी उपाययोजना उपविभागीय कृषी अधिकारी सोनटक्के यांनी शेतकऱ्यांना सूचविली.