शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांची होणार कलचाचणी

By admin | Updated: February 9, 2017 01:34 IST

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनाचे काम प्रभावीपणे होणे गरजेचे आहे.

गडचिरोली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनाचे काम प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. दहावीनंतर पुढील शिक्षणाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासंदर्भात बरेच विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला दिसून येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल विद्यार्थ्यांना व पालकांना अवगत व्हावा, यासाठी जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात येणार आहे. याबाबत जिल्ह्यातील शिक्षकांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी नागपूर विभागीय परीक्षा मंडळाचे सहसचिव श्रीराम चव्हाण, उपशिक्षणाधिकारी (माध्य) चावरे, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक विराज खराटे, प्रा. तम्मेवार, प्राचार्य कवठे उपस्थित होते. शासनातर्फे व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था मुंबईच्या वतीने विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय कसोट्यांच्या आधारे विविध शैक्षणिक क्षेत्रासंदर्भात मार्गदर्शन व समुपदेशन करते. राज्यात जवळपास २२ हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये असून त्यामध्ये ६५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यासाठी अंदाजे २ लाख ५० हजार शिक्षक कार्यरत आहेत. व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था मुंबई येथून व्यवसाय मार्गदर्शन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व सध्या कार्यरत असलेल्या राज्यातील शिक्षक समुपदेशकांची संख्या ५३९ आहे. मानसशास्त्रीय कसोट्या पेपर-पेन्सिलच्या माध्यमातून घेतल्या जातात. विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेता या पद्धतीचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना देता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय कलचाचणी घेण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी) ओएमईआर पद्धतीचा वापर मानसशास्त्रीय कसोट्या तयार करून आॅनलाईन संगणक प्रणाली विकसीत करण्यात येईल. आॅनलाईन पद्धतीने कलचाचणी घेणे शक्य होणार नाही, अशा ठिकाणी आॅफलाईन पद्धतीने कलचाचणी घेण्यात येणार असून यासाठी ‘ओएमईआर’ पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.