शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

जिल्हाभर बंदला नागरिकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:47 IST

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पहायला मिळाले. आंबेडकरी अनुयायांनी या प्रकरणाचा निषेध करीत सरकारविरोधात निदर्शने करून घोषणाबाजी केली.

ठळक मुद्दे गडचिरोलीत निदर्शने व निषेध सभा : तालुका मुख्यालयी मोर्चे व घोषणाबाजी, शाळा-बसफेºयाही ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पहायला मिळाले. आंबेडकरी अनुयायांनी या प्रकरणाचा निषेध करीत सरकारविरोधात निदर्शने करून घोषणाबाजी केली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा-कॉलेज आणि बसफेºयाही बंद राहिल्याने ९० टक्के व्यवहार ठप्प झाले होते. जिल्हाभरात कुठेही आंदोलनाने हिंसक वळण घेतले नाही.भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनानुसार गडचिरोली शहरात सकाळी ८ वाजता निषेध मोर्चा काढण्यात आला. बुधवार हा गडचिरोली शहरात बुधवारी बाजारपेठ बंद राहात असली तरी काही तुरळक व्यापारी दुकाने उघडतात. मात्र मोर्चानंतर त्यांनीही दुकाने बंद ठेवत आंदोलनकर्त्यांना सहकार्य केले.गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौकात सकाळी ८.३० वाजतापासून निदर्शने सुरू झाली. या ठिकाणी झालेल्या निषेध सभेत काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आ.विजय वडेट्टीवार, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, राष्टÑवादी काँग्रेसचे प्रकाश ताकसांडे, प्रभाकर बारापात्रे, फहीम शेख, जगन जांभुळकर, संजय कोचे, भारिप-बहुजन महासंघाचे रोहिदास राऊत, तसेच बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे व शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. त्यांनी या घटनेचा निषेध करताना सरकारला चांगलेच धारेवर धरले. ११ वाजताच्या दरम्यान मोठ्या संख्येने जमलेल्या आंबेडकरी अनुयायांनी इंदिरा गांधी चौकात मानवी साखळी तयार करून काही वेळासाठी चारही बाजुंची वाहतूक रोखून धरली. यावेळी एसडीपीओ सागर कवडे, ठाणेदार संजय सांगळे यांनी चोख बंदोबस्त ठेवून परिस्थिती हाताळली. दुपारी काही उत्साही युवक दुचाकींवरून फिरून रस्त्यालगत दुकान थाटून व्यवसाय करणाºया छोट्या दुकानदारांना बंदचे आवाहन करीत होते.कुरखेडा - कुरखेडा येथील बाजारपेठ बुधवारी पूर्ण दिवसभर बंद होती. युवकांनी बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर सर्व व्यापाºयांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली. त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व प्रमोद सरदारे, संतोष खोब्रागडे, जि.प. सदस्य प्रल्हाद कराडे, माजी जि.प. सदस्य अशोक इंदुरकर, भीमराव दहिवते, पुनेश वालदे, प्रमोद खोब्रागडे, यादव सहारे, गुड्डू वालदे, दयाराम खोब्रागडे, बालक भानारकर, संतोष राऊत, मनोज बोदेले, संघमित्रा ढवळे, पंचशीला सहारे, सविता जांभुळकर, सिंधू राऊत, लक्ष्मण नंदेश्वर, अशोक अंबादे, बंडू लाडे, प्रकाश उईके यांच्यासह समता सैनिक दल, महासभा महिला मंडळ तळेगाव, पंचशील नवयुवक मंडळ तळेगाव आदी उपस्थित होते. कुरखेडा तालुकास्थळापासून तीन किमी अंतरावर असलेल्या तळेगाव येथील पंचशील नवयुवक मंडळ, महामाया महिला मंडळ व समस्त बौद्ध समाज मंडळाच्या वतीने भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दुकाने व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले. पलसगड-कुरखेडा मार्गावर टायर पेटवून एक तास वाहतूक थांबविली. या आंदोलनाने कुठेही हिंसक वळण घेतले नाही. सायंकाळी काही ठिकाणी व्यवहार सुरू झाले.शाळकरी विद्यार्थ्यांचे हालसकाळपाळीत शाळा असणाºया काही शाळांमध्ये नेहमीप्रमाणे वर्ग भरले होते. मात्र १० वाजतानंतर आंदोलकांच्या आवाहनानुसार शाळांना सुटी देण्यात आली. दरम्यान नागपूर, चंद्रपूरसह बाहेरगावाहून बसगाड्या येत नसल्यामुळे सुरक्षेच्या कारणातून गडचिरोली आगारानेही सकाळी १० नंतर बाहेरगावी जाणाºया बसफेºया बंद केल्या. त्यामुळे बाहेरगावावरून गडचिरोलीत दररोज येणे-जाणे करणाºया शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली. बसफेºया सुरू होण्याच्या प्रतीक्षेत बराच वेळपर्यंत या विद्यार्थ्यांना बस स्थानकावर ताटकळत राहावे लागले. अशीच परिस्थिती काही तालुकास्थळीही होती.बसपाची वेगळी चूलविविध राजकीय पक्षांच्या वतीने सकाळी इंदिरा गांधी चौकात धरणे व निषेध सभा झाली. हे आंदोलनकर्ते तेथून गेल्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याच चौकात जमून सरकारविरोधी निदर्शने केली. काही वेळासाठी त्यांनी रास्ता रोकोही केला. त्यानंतर राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन भीमा कोरेगावच्या दंगलीतील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष वामन राऊत, जिल्हा प्रभारी रमेश मडावी, प्रशांत दोनाडकर, ज्योती सोमनकर, कृष्णा वाघाडे, तुलराम दुधे, केशवराव सामृतवार, अरविंद गजभिये आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.