लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : पोलीस विभागाच्या वतीने मुलचेरा येथील सांस्कृतिक भवनात जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान नागरिकांना शासनाकडून राबविण्यात येणाºया योजनांची माहिती देण्यात आली.सदर मेळावा प्रभारी अधिकारी पाठक यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. या मेळाव्याला मुलचेरा तालुक्यातील पोलीस पाटील, सरपंच, नगरसेवक, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य सादर करून उपस्थित मान्यवर व पंचांची मने जिंकली. स्पर्धेत विजेत्या संघाला पोलीस विभागाच्या वतीने रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मुलचेरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पाठक म्हणाले, पालकांनी आपल्या पाल्याला चांगल्या दर्जाचे शिक्षण द्यावे, असे मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी पोलिसांनी सहकार्य केले.
नागरिकांना योजनांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:52 IST
पोलीस विभागाच्या वतीने मुलचेरा येथील सांस्कृतिक भवनात जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान नागरिकांना शासनाकडून राबविण्यात येणाºया योजनांची माहिती देण्यात आली.
नागरिकांना योजनांची माहिती
ठळक मुद्देसांस्कृतिक स्पर्धा : मुलचेरा पोलीस स्टेशनचा उपक्रम