शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या कार्यालयावर नागरिकांची धडक

By admin | Updated: September 22, 2016 02:22 IST

१३ डिसेंबर २००५ पूर्वी वन जमिनीवर अतिक्रमण केलेल्या नागरिकांना सामूहिक व वैयक्तिक वनजमिनीचे पट्टे

प्रमुख मागणी : वनजमीन पट्ट्यासाठी अतिक्रमण पंजी उपलब्ध करून द्याअहेरी : १३ डिसेंबर २००५ पूर्वी वन जमिनीवर अतिक्रमण केलेल्या नागरिकांना सामूहिक व वैयक्तिक वनजमिनीचे पट्टे मिळण्याकरिता दावा सादर करण्यासाठी अतिक्रमण पंजी उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थी प्रतिनिधी कैलास कोरेत यांच्या नेतृत्वात बुधवारी पेरमिली वनपरिक्षेत्रातील शेकडो नागरिकांनी आलापल्लीच्या उपवनसंरक्षक कार्यालयावर धडक दिली. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६ अन्वये दावे सादर केलेल्या अतिक्रमणधारकांना वनजमिनीचे पट्टे दिले जातात. वन जमीन पट्ट्याच्या प्रस्तावात वन चौकशी अहवाल, शासकीय वनअभिलेख, १३ डिसेंबर २००५ पूर्वी वनजमिनीवर अतिक्रमण असल्याचा पुरावा ग्राह्य धरण्यात येतो. काही वर्षांपूर्वी पेरमिली वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. मात्र अतिक्रमीत नागरिकांना अद्यापही अतिक्रमण पंजी (पीवार) प्रत उपलब्ध करून देण्यात आली नाही. यासंदर्भात नागरिकांनी पेरमिलीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना विचारणा केली असता, काही कारणास्ताव दस्तावेज उपलब्ध नसल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली. त्यामुळे अतिक्रमणपंजी उपलब्ध करून देण्याची मागणी आलापल्लीचे वनसंरक्षक गिन्नी सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली. वन अभिलेख अतिक्रमण पंजी उपलब्ध करून दिल्यावर वनजमिनीचे सामूहिक व वैयक्तिक प्रलंबित दावे निकाली काढण्यास मदत होईल. तसेच संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी तुमच्या गावात येऊन अतिक्रमण पंजी उपलब्ध करून देतील, असे आश्वासन उपवनसंरक्षक सिंग यांनी दिले. याप्रसंगी राकाँचे पदाधिकारी इरफान पठाण, सीताराम मेश्राम, सुरेश मडावी, तुळशिराम मडावी, चैतू पल्लो, रमेश पल्लो, तुळशिराम पेंदाम, सतीश पेंदाम, नरसिंग कोडापे, दिलीप मडावी, मारोती मेश्राम, कमलाबाई कोडापे, चिंतामणी मडावी, पेंटू कोडापे, अमोल कोडापे, सावित्री आलाम, विलास तलांडे, गिरमा मेश्राम, तिरूपती पेंदाम आदींसह परिसरातील अतिक्रमणधारक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)