शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना प्रतिबंधक लस घेण्याकडे नागरिकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST

कोरची व तालुक्यात सुरुवातीला ४५ वयोगटावरील लोकांना कोविशिल्ड लस देण्याचा कार्यक्रम आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपकेंद्रात व कोरची ...

कोरची व तालुक्यात सुरुवातीला ४५ वयोगटावरील लोकांना कोविशिल्ड लस देण्याचा कार्यक्रम आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपकेंद्रात व कोरची ग्रामीण रुग्णालयात सुरू झाले, परंतु लस लावण्यासाठी आवश्यक प्रतिसाद येथील नागरिकांनी दिला नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील ५०० कोविशिल्ड लस जिल्ह्याला परत पाठविण्यात आले. याबाबत कोरची ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. बागराज धुर्वे यांना विचारणा केली असता, लसीकरण करण्यासाठी इंटरनेटची सुविधा व ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणारा ऑपरेटर आवश्यक आहे. परंतु ही सुविधा नव्हती व अफवेमुळे लस घेण्यासाठी नागरिक आले नाही. जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा कोरची तालुक्यात ४५ वर्ष वयोगटावरील लाेकांसाठी सुरू झालेल्या लसीकरण माेहिमेचा लाभ घेण्यास नागरिक पुढे येत नाही. काेराेना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर व्यक्तीची प्रकृती खराब होते आणि त्याचा मृत्यू होतो अशा प्रकारची अफवा ग्रामीण भागात असल्याने गैरसमजातून तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोकांमध्ये भीती आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश नागरिक लसीकरण केंद्रात किंवा शिबिरात जाऊन लस लावून घेण्यास तयार होत नाही कोरची तालुक्यात आतापर्यंत २ हजार ९३८ लस डोस लावण्यात आले आहेत. बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात १ हजार ४३, कोटगुल प्राथमिक आरोग्य केंद्रात ५८९, कोरची ग्रामीण रुग्णालयात १ हजार ३०६ लस डाेज लावण्यात जिल्ह्यात एकूण ७५ लसीकरण केंद्र आहेत. त्यामध्ये आतापर्यंत एकूण ९५ हजार ४४० डाेज लसीकरण झाले आहे. यामधील ३४ जण बाधित आढळून आले. विशेष म्हणजे, ही लस घेतल्यानंतर कोराेनाची बाधा अत्यल्प कमी प्रमाणात लोकांमध्ये होत असल्याचे गडचिरोली जिल्हा लसीकरण व माता बाल संगोपन अधिकारी डॉ. समीर बनसोडे यांनी सांगितले. ही लस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढून संसर्गाचा धोका कमी होतो़ ऑक्सिजन व्हेंटिलेटरची शक्यता फारच कमी असते तसेच मृत्यूचा धोकाही कमी होतो़ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार होत आहे.

बाॅक्स

गावांमध्ये काेराेनाचा शिरकाव

कोरोनाने जिल्ह्यासह तालुक्यामध्ये थैमान घातले आहे़ कोरची तालुक्यात आतापर्यंत ८०९ नागरिक बाधित झाले असून ६ जणांना जीव गमवावा लागला आहे. मागील काही दिवसातच कोरोनाचा प्रकोप कोरची तालुक्यामध्ये झपाट्याने वाढला असून शहरासह ग्रामीण भागातील बेडगाव, कोटगूल, सोनपूर, बेलगाव घाट, मसेली, बोटेकसा आदी गावांमध्ये सातत्याने कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेणे आवश्यक आहे़ अन्यथा संपूर्ण कोरची तालुका काही दिवसात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता आहे़

कोट

सोशल मीडियावर काही समाजकंटकांकडून अफवा पसरवण्यात येत आहे, की कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने लोक ‌मृत्युमुखी पडतात. तसेच अशक्तपणा येतो, असा गैरसमज पसरविण्यात येत आहे. त्यामुळे लोक लस घेण्यास नकार देत आहेत. कोविशिल्ड-कोव्हॅक्सिन ही सुरक्षित लस आहे. लस घेतल्यानंतर एक दोन दिवस ताप येणे,अंग दुखणे, मळमळ होणे यासारखी साैम्य लक्षणे दिसून शकतात. ह्या लसीमुळे प्रतिकारशक्ती वाढून त्यावर मात करता येते. दोन डाेस झाल्यानंतर ३० ते ४० दिवसांनंतर प्रतिकारशक्ती वाढते. ही लस घेतल्यानंतर मृत्यूचा धाेका अत्यल्प असताे. कुठलाही अशक्तपणा येत नाही किंवा विपरित परिणाम हाेत नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी मोफत लस घ्यावी आणि स्वतःसह परिवाराला सुरक्षित ठेवावे.

डॉ. विनोद मडावी, तालुका आरोग्य अधिकारी कोरची