शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘तारुण्यभान ते समाजभान’वर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:55 IST

ऑनलाईन लोकमतधानोरा : तालुक्यातील चातगाव नजीकच्या सर्च शोधग्राम येथे निर्माण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात देशभरातील ६५ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या शिबिरात तारुण्यभान ते समाजभान या विषयावर मंथन करण्यात आले.मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूरसह महाराष्ट्रातील १३ शासकीय महाविद्यालयच नव्हे तर गुजरात, उत्तरप्रदेश, तामिलनाडू व मध्यप्रदेश येथील वैद्यकीय विद्यार्थी या शिबिरात ...

ठळक मुद्देसर्चमध्ये निर्माण शिबिराचा समारोप : देशभरातील ६५ वैद्यकीय विद्यार्थ्यांचा सहभाग

ऑनलाईन लोकमतधानोरा : तालुक्यातील चातगाव नजीकच्या सर्च शोधग्राम येथे निर्माण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात देशभरातील ६५ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या शिबिरात तारुण्यभान ते समाजभान या विषयावर मंथन करण्यात आले.मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूरसह महाराष्ट्रातील १३ शासकीय महाविद्यालयच नव्हे तर गुजरात, उत्तरप्रदेश, तामिलनाडू व मध्यप्रदेश येथील वैद्यकीय विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले होते. ‘अर्थपूर्ण जिवनाचा समाजात शोध’ ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून सुरू झालेल्या निर्माणच्या आठव्या सत्रातील वैद्यकीय विद्यार्थ्यांचे पहिले शिबिर १० ते १८ फेब्रुवारीदरम्यान पार पडले. या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले. ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या व प्रश्नांबाबत या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अस्वस्थेवर या शिबिरात मार्ग शोधण्याचा प्रयत्न झाला.वैद्यकीय विद्यार्थी म्हटला की, त्याला शारीरिक रचना, त्यात होणारे बदल याची माहिती असतेच. मात्र लैंगिक जाणीव काय, माझा जोडीदार कसा असावा, माझ्या स्वंचा स्वीकार कसा करतो, याशिवाय घरच्या कुटुंबियांसोबत माझा संवाद होतो काय, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे डॉ. राणी बंग यांनी तारुण्यभान विषयावर मार्गदर्शन करताना वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिली. स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांनी स्पाईन फाऊंडेशनच्या संपूर्ण चळवळीची माहिती शिबिरार्थ्यांना दिली. गडचिरोली तसेच देशभरातील दुर्गम भागात स्पाईन सर्जरी करताना आलेले अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. सुनील चव्हाण यांनी जागतिक आर्थिक विषमतेवर कशी मात करता येऊ शकते, यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. योगेश कालकोंडे यांनी अमेरिका ते गडचिरोली हा वैद्यकीय प्रवास कसा झाला, यावर आपले अनुभव कथन केले.शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी महावाडा, मेंढाबोदली, लेखामेंढा, आंबेशिवणी, फुलबोडी, चांदाळा, रेखाटोला, बामणी आदी गावांना भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. या ग्रामीण भागात नागरिकांना कोणत्या समस्या भेडसावतात, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.सकारात्मक दृष्टिकोन हवाशिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शिबिरातून नेमके काय शिकायला मिळाले, हे त्यांनी सांगितले. जीवनाकडे पाहण्याचा खरा दृष्टिकोन मला सापडला, आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास मदत झाली, असे हर्ष जोगी या विद्यार्थ्याने सांगितले. स्वत:मध्ये आत्मविश्वास वाढला, असे अवनी पटेल यांनी म्हणाले.