सहा हत्ती : कमलापूर कॅम्पमध्ये काम सुरूआलापल्ली/कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथे वन विभागाचा हत्ती कॅम्प नवीन तलाव येथे आहे. तेथे हत्तीवर चोपिंग प्रक्रिया करण्यास सुरूवात झाली आहे. येथे सध्या अजित, वसंती, मंगला, राणी, प्रियंका, गणेश हे हत्ती सध्या आहेत. हत्तीच्या पायांना भेगा पडत असल्याने वर्षातून एकदा दरवर्षी चोपिंग प्रक्रिया हत्तीवर केली जाते. सध्या या प्रक्रियेला सुरूवात झाली असून हत्तीचे महावत एल. व्ही. मडावी, ए. आर. पोरलवार, डी. जी. वेलादी, चाराकटर एन. एस. राठोड, मदतनीस सुदीप रंगुवार, संतोष कोडापे, गणू वेलादी, नरेंद्र मडावी, समय्या मडावी, तुळशीराम सिडाम, नागेश मडावी हे चोपींग प्रक्रियेसाठी काम करीत आहेत. (वार्ताहर)
वन विभागाकडून हत्तीवर चोपिंग
By admin | Updated: January 13, 2016 01:53 IST