शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

कुलगुरू निवडीसाठी एका सदस्याची निवड

By admin | Updated: June 4, 2015 01:35 IST

गोंडवाना विद्यापीठाच्या विद्वत्त व व्यवस्थापन समितीची संयुक्त बैठक बुधवारी गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात दुपारी पार पडली.

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या विद्वत्त व व्यवस्थापन समितीची संयुक्त बैठक बुधवारी गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात दुपारी पार पडली. या बैठकीला ५३ सदस्यांपैकी ३९ सदस्य उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेनंतर मागील चार वर्षे विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्वत्त समित्या स्थापन करण्यात आल्या नव्हत्या. त्यानंतर मे महिन्यात या समित्यांचे गठण करण्यात आले. त्यानंतर बुधवारी या विद्वत्त व व्यवस्थापन समित्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्यासह समितीचे ३९ सदस्य उपस्थित होते. गोंडवाना विद्यापीठाला सध्या प्रभारी कुलगुरू चांदेकरांच्या रूपाने मिळालेला आहे. नवीन कुलगुरू निवड प्रक्रियेला आजच्या या बैठकीत प्रारंभ करण्यात आला. नवीन कुलगुरू नियुक्तीसाठी तीन सदस्यीय समिती गठीत केल्या जाते. विद्यापीठाच्या प्राधिकरणाच्या संयुक्त बैठकीत एका सदस्याचे नाव प्राधिकरणातर्फे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती आहे. या नावाबाबत विद्यापीठ प्रशासनाने कमालीची गोपनियता बाळगली असून कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याकडे संपर्क केला असता, त्यांनी एक सदस्याची निवड करण्यात आली, ऐवढीच माहिती दिली. त्या सदस्याचे नाव सांगण्यास त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना नकार दिला. प्राधिकरणाने एक सदस्य नियुक्त केला असल्यामुळे आता राज्यपालांचा प्रतिनिधी म्हणून एक व महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून एक सदस्य नियुक्त केला जाईल. त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू प्रक्रियेला प्रारंभ होईल. संयुक्त बैठकीत या विषयाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. दीड तास ही बैठक चालली, अशी माहिती मिळाली आहे. सकाळपासूनच विद्यापीठ प्रशासनाने या बैठकीबाबत प्रचंड गोपनियता बाळगलेली होती, हे विशेष.प्राधिकरणाची संयुक्त बैठक असल्याने या बैठकीत विद्यापीठाच्या विविध अडचणी तसेच नवीन सत्रात सुरू होणारे अभ्यासक्रम आदीबाबत चर्चा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र पहिली बैठक अवघ्या एक ते दीड तासात पार पडली. या बैठकीत एका सदस्याची निवड करण्याच्या पलीकडे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली नाही, अशी माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)