शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

शौचालयाच्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

By admin | Updated: June 24, 2015 02:34 IST

येथून १५ किमी अंतरावरील चिंतलपेठ येथे चार वर्षीय बालकांचा शौचालयाच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना २२ जून रोजी घडली.

चिंतलपेठ येथील घटना : नागरिकांचा बीडीओंना चार तास घेरावअहेरी : येथून १५ किमी अंतरावरील चिंतलपेठ येथे चार वर्षीय बालकांचा शौचालयाच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना २२ जून रोजी घडली. तब्बल चार महिन्यांपासून सदर खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. परंतु पंचायत समितीकडून अनुदान देण्यात आले नसल्याने काम सुरू करण्यात आले नव्हते. याच खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू झाल्याने नागरिक संतप्त झाले असून या प्रकरणी दोषींवर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. खड्ड्यात पडून मृत्यू पावलेल्या बालकाचे नाव नयन प्रविण दुर्गे (४) असे आहे. या बालकाच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी संवर्ग विकास अधिकारी एस. एम. तडस, सहायक संवर्ग विकास अधिकारी सुभाष चांदेकर, विस्तार अधिकारी काळबांधे, मनेरगाचे प्रमुख किशोर वाळके, खमनचेरू ग्रा.पं.च्या सचिव संध्या गेडाम यांना चार तास घेराव करण्यात आला. त्यानंतर संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर वातावरणातील तणाव निवळला. घटनेच्या दिवशी मृतक बालकाचे वडील प्रविण दुर्गे व त्याची आई घराच्या पुढे सेवाग्रामच्या दवाखाण्यातून आलेल्या आपल्या नातेवाईकासोबत चर्चा करीत होते. १५ मिनिटाच्या अवधीत नयन डोळ्यासमोरून गेला. त्यानंतर आईवडिलांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो दिसला नाही व त्याचा खड्ड्यात पडून अंतच झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अहेरी येथून प्रा. किशोर बुरबुरे, प्रकाश दुर्गे, सुरेंद्र अलोणे, जावेद अली आदींनी संवर्ग विकास अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना घेऊन चिंतलपेठ गाठले. (प्रतिनिधी)