शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बाल रूग्णालयाला अधीक्षक मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:53 IST

येथील महिला व बाल रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदीपचंद सोयाम यांच्याकडे जबाबदारी : अन्य पाच कर्मचाºयांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येथील महिला व बाल रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच अन्य पाच कर्मचाºयांनाही नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे सदर रूग्णालय लवकरच सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या इंदिरा गांधी चौकाजवळ महिला व बाल रूग्णालयाची प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे काम दोन वर्षांपूर्वीच जवळपास पूर्ण झाले आहे. या ठिकाणी डॉक्टर व आरोग्य कर्मचाºयांच्या नेमणुकीला शासनाने मंजुरीही दिली आहे. मात्र अजूनपर्यंत या ठिकाणी डॉक्टर व कर्मचारी नेमले नव्हते. सार्वजनिक आरोग्य विभागाने महाराष्टÑ वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘अ’ मधील जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गातील ६९ वैद्यकीय अधीक्षकांच्या नव्याने पदस्थापना केल्या आहेत. त्यात विनंतीनुसार डॉ. दीपचंद सोयाम यांची महिला रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच अन्य पाच कर्मचाºयांनाही नेमणूक देण्यात आली आहे.या रूग्णालयासाठी १०० च्या जवळपास पदे मंजूर आहेत. ही सर्व पदे भरल्याशिवाय रूग्णालयाचा कारभार चालणे कठीण होणार आहे. केवळ वैद्यकीय अधीक्षक व पाच आरोग्य कर्मचाºयांच्या भरवशावर १०० खाटांचे रूग्णालय असलेल्या महिला रूग्णालयाचा भार सांभाळणे कठीण आहे. त्यामुळे या ठिकाणी इतरही कर्मचाºयांची नेमणूक करणे गरजेचे आहे.रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याचे बाहेरून दिसत असले तरी काही खोल्यांचे आतील काम अजूनही शिल्लक आहे. मात्र कंत्राटदाराने या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. रूग्णालय सुरू होण्यासाठी सदर काम पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. विशेष म्हणजे, महिला व बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी विविध प्रकारची महागडी साधनसाम्रगी लागते. मात्र सदर साहित्यही अजूनपर्यंत रूग्णालयला उपलब्ध झाले नाही. उर्वरित पदभरती करून साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.शशिकांत शंभरकर नवीन डीएचओजिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. कमलेश भंडारी यांची भंडारा येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर डॉ. शशिकांत शंभरकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. यापूर्वी डॉ. शशिकांत शंभरकर यांच्याकडे मागील साडेतीन वर्षांपासून जिल्हा माता व बाल संगोपन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांना येथील आरोग्य व्यवस्थेचा अभ्यास आहे.