शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

मुख्य वनसंरक्षकाची एसबीमार्फत चौकशी होणार

By admin | Updated: July 22, 2015 02:29 IST

गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी यांची बदली पावसाळी अधिवेशन संपण्याआधी करण्यात येईल.

वनमंत्र्यांचे आश्वासन : विजय वडेट्टीवारांनी भ्रष्टाचाराच्या चौकशीची केली होती मागणीगडचिरोली : गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी यांची बदली पावसाळी अधिवेशन संपण्याआधी करण्यात येईल. तसेच त्यांच्याविषयीच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिल्यास सखोल चौकशी करण्यात येईल. त्याचप्रमाणे एसीबीमार्फतही चौकशी करण्यात येईल. असे आश्वासन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांच्या उत्तरात दिले. टी. एस. के. रेड्डी यांनी मागील चार वर्षात रोजगार हमी योजना व बांबू तोड आणि खरेदी विक्री व्यवहारात केलेल्या भ्रष्टाचाराबाबत आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर वनमंत्री उत्तर देत होते. या संदर्भात विधानसभेत आमदार वडेट्टीवार म्हणाले की, मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांनी गेल्या चार वर्षात १०० कोटीच्या वर भ्रष्टाचार केला असून याबाबत पुरावे पाहिजे असल्यास मी द्यायला तयार आहे. रेड्डी यांनी नियम व अटीला डावलून कुनघाडा परिक्षेत्र कक्ष क्रमांक ५१, ५२, ६७, पोटेगाव परिक्षेत्र कक्ष क्रमांक ७३, ७४, ७८, ८८, धानोरा परिक्षेत्र कक्ष क्रमांक ४९९, ५००, ५०१, ५२४ हे या तिन्ही क्षेत्रातील कूप सन २०१२-१३ मध्ये बांबू तोडीस उपलब्ध नसताना अ वर्गात येणारे हे तिन्ही कूप तोडीस पात्र ठरवून अवैधरित्या बांबूतोड केली. खोब्रामेंढा गावास कक्ष क्रमांक ४१६ ची सन २०१२ व सन २०१४ मध्ये बांबू कटाई मुख्य वनसंरक्षक यांनी अवैधपणे परवानगी दिल्यामुळे १ हजार ७०० बांबूची कटाई करण्यात आली. खोब्रामेंढा गावातील परिक्षेत्र क्रमांक ४१६ मध्ये जंगलच नसताना अवैधपणे नियमबाह्य बांबू तोडीस परवानगी देण्यात आली. बेडगाव, मालेवाडा, पुराडा या तीन क्षेत्रामध्ये चार वर्षांत रोजगार हमी योजनेंतर्गत ४० कोटींची कामे करण्यात आली. बोगस मजुरांची हजेरी पटावर नावे दाखवून त्यांच्या नावे लाखो रूपयांचे वेतन काढून गैरप्रकार केले. या तीन क्षेत्रात चार वर्षांत २५० पेक्षा जास्त बंधारे बांधण्यात आली. त्यापैकी २१२ बंधाऱ्यांचे बांधकाम अर्धवट असून ते पूर्ण झाल्याचे दाखवून गैरप्रकार केला आहे. मजुरांच्या मार्फतीने जमा केलेल्या दगड कंत्राटदाराच्या माध्यमातून दाखवून बोगस बिलाद्वारे खरेदी केल्याचेही दाखविण्यात आले आहे, असे सभागृहात आमदार वडेट्टीवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)