शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरीतील स्वागताने भारावले मुख्यमंत्री फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:14 IST

महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी आरमोरी येथे आले असता, त्यांनी गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले.

ठळक मुद्देपोरड्डीवार यांच्या प्रांगणात मार्गदर्शन : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी तत्पर राहण्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी आरमोरी येथे आले असता, त्यांनी गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले. या स्वागताने भारावलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्याच प्रांगणात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना या जिल्ह्याच्या सर्वांगिन विकासासाठी तत्पर राहण्याची ग्वाही दिली. जनतेचा आशीर्वाद आणि जनादेश घेण्यासाठी तुमच्याकडे आलो असल्याचे सांगितले.याप्रसंगी आदिवासी विकास राज्यमंत्री परिणय फुके, खासदार अशोक नेते, आमदार गिरीष व्यास, आमदार कृष्णा गजबे, आमदार किर्तीकुमार भांगडिया, गडचिरोली जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार प्रामुख्याने उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आरमोरीला येणार असल्याची माहिती मिळताच सायंकाळपासून नागरिकांनी व भाजप कार्यकर्त्यांनी प्रकाश पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. पण या यात्रेच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमात मुख्यमंत्री आरमोरीवासियांना वेळ देणार का, अशी शंकाही नागरिकांमध्ये उपस्थित केली जात होती. मात्र महाजनादेश यात्रेचे ब्रह्मपुरीवरून आरमोरी येथे सायंकाळी ७.३० वाजता आगमन झाल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी भेट देण्याची सूचना करून त्यांचे प्रांगण गाठले.जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावून गेल्या पाच वर्षात आम्ही केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून पुन्हा या महाराष्टÑाला प्रगतीपथावर व विकासाकडे नेण्यासाठी मी येथे आलो आहे. तुमचा आशीर्वाद घेऊनच मी मुंबईला जाणार, असे मुख्यमंत्री म्हणाले. पाऊस सुरू झाल्याने मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण आवरते घेत गडचिरोलीकडे प्रयाण केले.या कार्यक्रमाला माजी आमदार अतुल देशकर, आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी, जि.प. सदस्य संपत आळे, सभापती भारत बावनथडे, सागर मने, सुनिता चांदेवार, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दुर्वेश भोयर, कृऊबासचे सभापती क्षिरसागर नाकाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार, विलास पारधी, पं.स. सदस्य निता ढोरे, नगरसेवक माणिक भोयर, सुनिता मने, संगीता रेवतकर आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.