शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
2
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
5
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
6
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
7
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
8
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
9
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
10
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
11
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
12
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
13
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
14
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
15
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
16
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
17
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
18
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
19
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
20
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका

बुद्धीबळ स्पर्धेतून जिल्ह्याच्या क्रीडा विकासास चालना मिळेल!

By admin | Updated: March 7, 2017 00:48 IST

गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासी जिल्ह्यात बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करणे हे जिल्ह्याच्या क्रीडा विकासास चालना देणारी बाब आहे.

विजेत्यांना पारितोषिक प्रदान : प्रंचित पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन; २०० स्पर्धकांनी घेतला सहभागगडचिरोली : गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासी जिल्ह्यात बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करणे हे जिल्ह्याच्या क्रीडा विकासास चालना देणारी बाब आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन दरवर्षी होत राहिले तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात व जागतिक पातळीवर गडचिरोली जिल्ह्याचे नावलौकीक होईल, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले. गडचिरोली डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन व दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बुध्दीबळ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, डॉ. प्रशांत चलाख, बुध्दीबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष अमित सुचक आदी मान्यवर उपस्थित होते. बुध्दीबळसारख्या स्पर्धा आयोजित करून गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे, असे सांगत बुध्दीबळ खेळाची सुरूवात कशी झाली व त्यात परदेशात बदल कसा झाला, याबाबत पोरेड्डीवार यांनी मार्गदर्शन केले. सदर बुध्दीबळ स्पर्धेत एकूण २०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बुध्दीबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, सचिव हेमप्रकाश बारसागडे, सहसचिव राजू सोरते, सदस्य पी. डब्ल्यू भुरसे, जी. के. नरड, एस. एम. अलमपटलावार, सी. एम. तोटावार, ए. के. पत्रे यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष तथा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले तर संचालन व आभार किरण सांबरे यांनी मानले. सदर कार्यक्रमाला बँकेचे कर्मचारी, बुध्दीबळ स्पर्धेतील सहभागी खेळाडू व जिल्ह्यातील बुध्दीबळ प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)हे आहेत बुद्धीबळ स्पर्धेचे विजेतेसदर बुध्दीबळ स्पर्धेत खुल्या गटातून अजयकुमार सिंग प्रथम, रोशन कोंडावार द्वितीय तर उमेश सहारे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. हायस्कूल गटातून दीप जुवारे प्रथम, सुयोग होनमाने, निशाद खोब्रागडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. मिडल स्कूल गटातून श्रीरंग गौरकार प्रथम, सारंग उरकुडे द्वितीय, प्रविण श्रीरामे तृतीय तसेच प्रायमरी गटातून हर्ष सूचक प्रथम, वेद चलाख द्वितीय, ओजस रासेकर याने तृतीय क्रमांक पटकाविला. बेस्ट वुमन म्हणून कुमोदिनी बारसागडे यांची निवड करण्यात आली. बेस्ट ब्रिलीयंट किड्स अ‍ॅकॅडमी पॅरेंट्स पुरस्काराचे मानकरी डॉ. प्रशांत चलाख ठरले. गडचिरोली स्पेशलच्या खुल्या गटातून व्यंकटस्वामी वेनमपल्ली प्रथम, अजय निंबाळकर द्वितीय, ज्ञानेश्वर वर्धेकर तृतीय, भाग्यश्री भांडेकर चौथी तर वैशाली पुणेकर पाचव्या क्रमांकावर राहिली. हायस्कूल गटातून साईल हनवते प्रथम, ईशान्य कुकडे द्वितीय, सिध्देश भरडकर तृतीय, अखिलेश धाईत चतुर्थ, ओम नागापुरे पाचव्या, अंश तोटावार सहाव्या आणि क्रिश श्रुंगारपवार सातव्या क्रमांकावर राहिला. हायस्कूल गटातून ओम टेप्पलवार प्रथम, विप्लव इटनकर द्वितीय, साईल देवाडे तृतीय, आदित्य बोदलवार चतुर्थ तसेच आयुष वंजारी, क्षितीज नेरकर व ध्रुव शर्मा हे अनुक्रमे पाचव्या, सहाव्या व सातव्या क्रमांकावर राहिले. प्रायमरी गटातून यश चिचघरे प्रथम, क्रिष्णा पोगुलवार द्वितीय, तन्मय पत्रे तृतीय, विराज ठाकरे चतुर्थ तर कुणाल गोवर्धन, प्राची श्रीपदवार व चिन्मय खरवडे हे तिघेजण अनुक्रमे पाचव्या, सहाव्या व सातव्या क्रमांकाचे विजेते ठरले.