शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानातील साखर महागली

By admin | Updated: April 14, 2017 01:15 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गरीब नागरिकांना शासनाकडून धान्य व साखर पुरवठा केली जाते.

गरिबांना फटका : १३.५० रूपयांवरून १५ रूपये किलोवर पोहोचली साखरगडचिरोली : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गरीब नागरिकांना शासनाकडून धान्य व साखर पुरवठा केली जाते. मात्र राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानातून दिल्या जाणाऱ्या साखरेच्या किमतीत प्रती किलो मागे १ रूपया ५० पैशाने वाढ केली आहे. त्यामुळे गरीब माणसाच्या खिश्याला साखर खरेदी करताना फटका बसणार आहे.राज्य सरकारने अन्न, धान्य वाहतुकीचे दर सुधारीत केले आहेत. साखर वाहतुकदारांकडून वाहतूक दरवाढीची मागणी केली जात होती. साखरेचे वाढलेले बाजारभाव विचारात घेऊन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने १३ रूपये ५० पैसे प्रती किलो साखरेचा भाव आता १५ रूपये केला आहे, असा दावा शासनाच्या वतीने करण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांकडून कमिशन वाढीची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ही भाव वाढ अपरिहार्य असल्याचे सरकारच्या वतीने या निर्णयावर प्रतिक्रिया देताना कळविण्यात आले आहे. स्वस्त धान्य दुकानातून ठराविक शिधापत्रिकाधारकांनाच साखरेचा पुरवठा केला जातो. या नव्या दरवाढीमुळे ग्रामीण व शहरी भागातील स्वस्त धान्य दुकानातून साखर घेणाऱ्या ग्राहकांना फटका बसणार आहे. एप्रिल २०१७ पासून स्वस्त धान्य दुकानातून ही वाढीव दरवाढ लागू केली जाणार आहे, अशी माहितीही अन्न व नागरी व ग्राहक संरक्षण विभागाने दिली आहे. वाढत्या महागाईमध्ये आता रेशनच्या साखरेसाठीही अधिकची किमत गरीब नागरिकांना मोजावी लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढस्वस्त धान्य दुकानदारांना यापूर्वी प्रति क्विंटल साखरेमागे केवळ ६ रूपये ३६ पैसे एवढेच कमिशन दिले जात होते. सदर कमिशन अत्यंत कमी असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांच्या संघटनांनी शासनावर दबाव टाकून कमिशन वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता प्रती क्विंटल ७० रूपये कमिशन दिले जाणार आहे.