शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य व केरोसीन विक्रेते आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:45 IST

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गडचिरोली जिल्हा केरोसीन व स्वस्त धान्य विक्रेता वेल्फेअर असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर मोर्चा धडकला : जिल्हाभरातील दुकानदार सहभागी; शासनच्या धोरणावर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गडचिरोली जिल्हा केरोसीन व स्वस्त धान्य विक्रेता वेल्फेअर असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान जिल्हाभरातून आलेले केरोसीन व स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली.स्थानिक इंदिरा गांधी चौकातून दुपारी १ वाजताच्या सुमारास चंद्रपूर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या दुकानदारांचा मोर्चा निघाला. या मोर्चात संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलाश शर्मा, उपाध्यक्ष अरूण कुंभलवार, सचिव अनिल भांडेकर, आरमोरीचे तालुकाध्यक्ष दादाजी माकडे, अनिल किरमे, रवींद्र निंबेकार, मुलचेराचे अशोक करमरकर, सचिव मनिंद्र हलदार, चामोर्शीचे वाघाडे, देसाईगंजचे दादाजी भर्रे, नाजमी शेख, कुरखेडाचे वाय. जी. मांडवे, गडचिरोलीचे रामदास पिपरे, सिरोंचाचे शबीर अली, धानोराचे जाकीर कुरेशी, अहेरीचे तालुकाध्यक्ष एम. बी. बेझलवार, मुलचेराचे अशोक करमकर, एटापल्लीचे बाबुराव गंपावार आदीसह जिल्हाभरातील हजारो दुकानदार सहभागी झाले होते. मोर्चापूर्वी गांधी चौकात सभा घेण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा पोहोचल्यानंतर तिथेही सभा घेण्यात आली. या सभेदरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यमान सरकारच्या धान्य वितरण प्रणालीच्या धोरणावर जोरदार टीका केली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. मोर्चादरम्यान दुकानदारांनी घोषणाबाजी केली.निवेदनातील मागण्यावाढत्या महागाईनुसार स्वस्त धान्य दुकानदारांचा खर्च देण्यात यावा, बंद केलेल्या केरोसीन दुकानातून सरकारने गॅस वितरण सुरू करावे, २००९ ते २०११ दरम्यानचे वाहतुकीचे बिल, पोत्यानिहाय कमिशन व हमालीभाडे देण्यात यावे, वाहतुकीचे बिल व्याजासह देण्यात यावे, दुकानदारास किमान २४ हजार रूपये वेतन देण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.