शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र चामोर्शीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:02 IST

यंदाच्या खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या धान कापणीचे वेध शेतकºयांना लागले असतानाच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने यंदाच्या रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देभाजीपाल्याचे क्षेत्र अधिक : जिल्हाभरात ३४ हजार ४१२ हेक्टरवर होणार पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यंदाच्या खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या धान कापणीचे वेध शेतकºयांना लागले असतानाच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने यंदाच्या रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामात ३४ हजार ४१२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी होणार आहे. विशेष म्हणजे चामोर्शी तालुक्यात सिंचनाच्या सोयीसुविधा बºयापैकी असल्याने या तालुक्यात रब्बीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक १० हजार ५८० हेक्टर क्षेत्रावर यंदा रब्बी पिकांची लागवड करण्यात येणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात रब्बी पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार हेक्टर आहे. यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारी ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गहू ७५५ हेक्टर, सूर्यफूल २५ हेक्टर, तीळ २ हजार ८५८ हेक्टर, ऊस १६० हेक्टर, हरभरा ३ हजार ८३० हेक्टर तसेच सर्वाधिक ६ हजार ६५० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पीक घेण्याचे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले. विशेष म्हणजे गतवर्षी २०१६-१७ च्या हंगामात १०० टक्के क्षेत्रात रब्बी पिके गडचिरोली जिल्ह्यात घेण्यात आली होती.आरमोरी तालुक्याच्या वैरागड परिसरात जमिनीची सुपिकता चांगली असल्याने या भागातील बहुतांश शेतकरी आता धानपिकासोबतच रब्बी हंगामातील हरभरा व सूर्यफुलाच्या शेतीकडे वळले आहेत. जिल्ह्याच्या विविध भागात गहू पिकाची पेरणीही बºयापैकी होत असते. एकूणच जिल्ह्यातील शेतकरी आता खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात विविध पिके घेत आहेत.परतीच्या पावसाने हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यतागडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामातील धान व इतर पिके अंतिम टप्प्यात असून ते निघण्याच्या स्थितीत आहेत. हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू असून काही ठिकाणी मळणीही केली जात आहे. खरीप हंगामाच्या अंतिम टप्प्यात परतीच्या जोरदार पावसाने पिकांना तडाखा दिला.या पावसामुळे शेतजमिनीमध्ये प्रचंड ओलावा निर्माण झाला आहे. परिणामी रब्बी पिकाच्या पेरणीसाठी नांगरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा रब्बी पिकांचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता अनेक शेतकºयांनी व्यक्त केली आहे. धान कापणीनंतर रब्बी पिकाच्या पेरणीस दरवर्षी वेग येत असतो.