शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड तालुका प्रभारींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:29 IST

आदिवासी बहूल व सर्वात मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील बहुतांश अधिकाऱ्यांचे पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर प्रशासन चालविले जात आहे.

ठळक मुद्देकायम दुर्लक्ष : शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : आदिवासी बहूल व सर्वात मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील बहुतांश अधिकाऱ्यांचे पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर प्रशासन चालविले जात आहे. त्यातच निम्याहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पदे रिक्त असल्याने तालुक्याचा विकास रखडला आहे.तालुकास्तरावर संवर्ग विकास, प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक, पशुसंवर्धन अधिकारी, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी ही पदे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. तालुक्याच्या विकासाबाबत निर्णय घेऊन प्रशासकीय यंत्रणा राबविण्याचे महत्त्वाचे काम या अधिकाºयांमार्फत केले जाते. मात्र ही सर्व पदे रिक्त आहेत. या सर्व पदांवर कनिष्ठ अधिकाºयांना बसविण्यात आले आहे किंवा दुसºया तालुक्यातील अधिकाºयाकडे प्रभार सोपविण्यात आले आहे. जंगलाने व्यापलेला हा तालुका शिक्षण, आरोग्य, वीज, रस्ते, स्वच्छ पाणी या मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. काही गावांपर्यंत अजुनही रस्ते पोहोचले नाही. निवडणुकीच्या वेळी आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी पाच वर्ष गायब होतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींवरचाही विश्वास उडाला आहे.पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी हे महत्त्वाचे पद आहे. मात्र हे पद प्रभारींवर सोपविण्यात आले आहे. फरेंद्र कुतीरकर व किशोर गज्जलवार यांची कारकिर्द सोडली तर आजपर्यंत नियमित अधिकारी लाभला नाही. आदिवासींसाठी योजना राबविणाºया एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचेही पद रिक्त आहे. सहायक प्रकल्प अधिकाºयांकडे प्रकल्प अधिकाºयाचा प्रभार सोपविला आहे.भामरागड तालुक्यात ८० टक्के आदिवासींची लोकसंख्या असतानाही स्वतंत्र कार्यालय सुध्दा बनू शकले नाही. निरज मोरे यांच्याकडे प्रकल्पाचा प्रभार सोपविला आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली