शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास हाेऊ शकताे घरात कायमचा अंधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:39 IST

गडचिराेली : आपल्या दैनंदिन गरजेसाठी वीज ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक वीज युनिटचे बिल भरणे अनिवार्य असताना वीज बिल चुकविण्यासाठी काही ...

गडचिराेली : आपल्या दैनंदिन गरजेसाठी वीज ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक वीज युनिटचे बिल भरणे अनिवार्य असताना वीज बिल चुकविण्यासाठी काही ग्राहक विद्युत मीटरमध्ये फेरफार करून वीज वितरण कंपनीची फसवणूक करतात; परंतु ही वीज चाेरी उघडकीस आल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या घरात कायमचा अंधार हाेऊ शकताे. एवढेच नाही तर तडजाेडी व दंडाची रक्कम अदा न केल्यास फाैजदारी कारवाईला सामाेरे जावे लागते. गडचिराेली जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्याेगिक व कृषी ग्राहकांना वीज पुरवठा केला जाताे. वीज वापराच्या माेजमापासाठी ग्राहकांच्या घरात मीटर बसविले जाते. मीटर रीडिंगनुसार वीज बिलाची आकारणी केली जाते.

बाॅक्स .....

मीटर जप्ती व दंड

वीज चाेरी करणे कायद्याने गुन्हा आहे. एखाद्या ग्राहकाकडे वीज चाेरी पकडली गेल्यास त्याने चुकविलेल्या वीज बिलाची रक्कम, दंड तसेच तडजाेडीची रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात येताे. हा दंड न भरल्यास कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई वीज वितरण कंपनीच्या वतीने केली जाते.

विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करून विजेची चाेरी केली जाते. मीटरमध्ये एक्स-रे पट्टी टाकून मीटर थांबविणे, रेजिस्टंट टाकणे, मीटर बायपास करणे आदी प्रकार हाेतात.

बाॅक्स .....

कधीही हाेऊ शकते मीटरची तपासणी

विद्युत चाेरीला आळा घालण्यासाठी महावितरणची पथके सदैव दक्ष असतात. एखाद्या ठिकाणी वीज चाेरी हाेत असल्याची शंका आल्यास किंवा काेणी गुप्त माहिती दिल्यास अथवा तक्रार केल्यास ही पथके व्यक्ती, उद्याेग किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानांवर धाड टाकून विद्युत मीटरची तपासणी करतात.

बाॅक्स ....

वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्याविरुद्ध कारवाई

१७६

काेट ......

महावितरणच्या चंद्रपूर व गडचिराेली मंडळातर्फे वीज चाेरीविरुद्ध विविध माेहिमा राबविण्यात आल्या. एप्रिल २०१७ ते ३० जून २०१८ या कालावधीत एकूण १ हजार ९४७ वीज चाेऱ्या पकडण्यात आल्या. गडचिराेली विभागात आकडे टाकून वीज चाेरीची १७६ प्रकरणे उघडकीस आली.

- आनंद कुमरे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण.