शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या याद्यांमुळे बदल्या रखडल्या

By admin | Updated: May 29, 2017 02:36 IST

जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या बदल्या सलग दुसऱ्या वर्षीही होत नसल्याने दुर्गम भागातील शिक्षकांची घोर निराशा झाली आहे.

अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी : दुर्गम भागातील शिक्षक संतप्तलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या बदल्या सलग दुसऱ्या वर्षीही होत नसल्याने दुर्गम भागातील शिक्षकांची घोर निराशा झाली आहे. त्यांच्यामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. शिक्षकांच्या बदल्या न होण्यासाठी चुकीच्या समायोजनाच्या याद्या कारणीभूत आहेत. चुकीच्या याद्या तयार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी दुर्गम भागातील शिक्षकांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्या हा अतिशय किचकट व वादग्रस्त प्रश्न ठरला आहे. मार्च महिन्यामध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापक व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया राबविली. मात्र अधिकाऱ्यांनी शासन निर्णय डावलून समायोजनेच्या याद्या तयार केल्या आहे. त्यामुळे विज्ञान पदवीधर शिक्षक न्यायालयात गेले. शासन नियमात बसत नसताना सुध्दा प्रशासनाने काही शिक्षक संघटनांच्या म्होरक्यांच्या दबावात येऊन विषय शिक्षकांची भरती केली. विज्ञान पदवीधरांवर झालेल्या अन्यायाविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेऊन स्थगनादेश प्राप्त केला. समायोजनाची प्रक्रिया ठप्प पडली आहे. त्यामुळे पुढच्या बदल्या करणे शक्य नसल्याने जिल्हा परिषदेला यावर्षी सुध्दा बदल्या रद्द करावी लागली आहे. विज्ञान पदवीधरांची ३० जून ला सुनावणी आहे. तोपर्यंत शिक्षकांच्या बदल्या करणे अशक्य होणार आहे.