शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बदलला दुकानांचा लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

गडचिरोली शहरात त्रिमूर्ती चौकालगत व या परिसरातील रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आहे. याशिवाय चंद्रपूर मार्गावर कारगिल चौकापर्यंत व त्यापुढे सुद्धा बाजारपेठ आहे. चामोर्शी, धानोरा व आरमोरी मार्गावर विविध वस्तूंची दुकाने आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही दुकानदारांनी दुकानाचे प्रवेशद्वार सुशोभित केले आहे. मंडप तयार करून विद्युत रोषणाई केली आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेत सायंकाळी झगमगाट : दिवाळी सणानिमित्त विविध वस्तूंनी सजली दुकाने

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवाळी सणानिमित्त बहुतांश नागरिकांकडून विविध वस्तूंची खरेदी आवर्जुन होत असल्याने दिवाळी सणादरम्यान बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. ग्राहकांनी खरेदीसाठी आपल्याच दुकानाला प्राधान्य द्यावे यासाठी यावेळी अनेक दुकानदार विशेष काळजी घेत आहेत. दुकानाचा लूक बदलून आकर्षकपणा वाढविण्याकडे दुकानदारांचा कल वाढला आहे. गडचिरोली शहरात हे ट्रेंड वाढत आहे.गडचिरोली शहरात त्रिमूर्ती चौकालगत व या परिसरातील रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आहे. याशिवाय चंद्रपूर मार्गावर कारगिल चौकापर्यंत व त्यापुढे सुद्धा बाजारपेठ आहे. चामोर्शी, धानोरा व आरमोरी मार्गावर विविध वस्तूंची दुकाने आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही दुकानदारांनी दुकानाचे प्रवेशद्वार सुशोभित केले आहे. मंडप तयार करून विद्युत रोषणाई केली आहे. ही रोषणाई व झगमगाट पाहून सर्वसामान्य नागरिकांच्या घरी दिवाळी आली नसली तरी शहरी भागात दिवाळीच्या उत्सवाला प्रारंभ झाल्याचे जाणवत आहे. विविध प्रकारचे विद्युत दिवे सायंकाळच्या सुमारास सुरू केले जात आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात रंगीबिरंगी व चकाकणारी तोरणं लावण्यात आली आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे सजावट झालेले दुकान मार्गाने जात असलेल्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. दीपावली सणादरम्यान गडचिरोलीची बाजारपेठ रात्री १० वाजतानंतरही सुरू राहत असल्याचे दिसून येत आहे.खास दिवाळी ऑफरआपल्या दुकानातील वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी व्हावी, ग्राहकांचा लोंढा आपल्याच दुकानाकडे वळावा, या हेतूने शहरातील काही दुकानदारांनी खास दिवाळी आॅफर सुरू केली आहे. अशा प्रकारची ऑफर कापड, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानांमध्ये आहे. काही किराणा दुकानदारांनीही विशिष्ट रकमेच्या खरेदीवर सवलत घोषित केली आहे. प्रवेशद्वारातच दिवाळी ऑफरचे फलक झळकत आहेत.सुवर्णालंकार, इलेक्ट्रिक वस्तू व कपड्यांना प्राधान्यदिवाळी सणानिमित्त गडचिरोली शहरातील बाजारपेठ सजली असून ग्राहक सोन्याचे दागिने व इलेक्ट्रिक वस्तूच्या खरेदीवर भर देत आहेत. विविध प्रकारच्या पणत्या व आकाश कंदिल विक्रीसाठी आले आहे. रस्त्यालगत असलेल्या फुटपाथवर रांगोळी व पूजेच्या साहित्याची दुकाने लागली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बाजारपेठेत नागरिकांची वस्तू खरेदीसाठी गर्दी होत आहे. विशेष करून महिला व युवती सोन्याचे दागिने व कापड खरेदी करताना दिसून येत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांसह विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना दिवाळीनिमित्त बोनस मिळाला आहे. त्यामुळे हे सर्व कर्मचारी व कामगार दिवाळीनिमित्त विविध वस्तूंची खरेदी करताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागातील बरेच नागरिक गडचिरोली शहरात येऊन वस्तूंची खरेदी करताना दिसून येत आहेत. एकूणच शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची दिवसभर गर्दी राहात असून आर्थिक उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी