शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

स्वत:ची व जिल्ह्याची ओळख बदलविणार

By admin | Updated: December 13, 2014 22:37 IST

जिल्ह्याचे खासदार व माझे सहकारी नवनिर्वाचित आमदारद्वय तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींच्या सामूहिक प्रयत्नाने लोकांच्या हितासाठी झटण्याचे ठोस अभिवचन राज्याचे आदिवासी विकासमंत्री

गडचिरोलीत सत्कार : अम्ब्रीशराव महाराज यांचे प्रतिपादन गडचिरोली : जिल्ह्याचे खासदार व माझे सहकारी नवनिर्वाचित आमदारद्वय तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींच्या सामूहिक प्रयत्नाने लोकांच्या हितासाठी झटण्याचे ठोस अभिवचन राज्याचे आदिवासी विकासमंत्री राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव सत्यवानराव आत्राम यांनी दिले. आगामी भविष्यकाळात ‘राजा’ म्हणून असलेली माझी प्रतिमा पुसून काढण्यासोबतच मागास-मागास म्हणून उर्वरित महाराष्ट्रात हिणविल्या जाणारी ‘गडचिरोली’ जिल्ह्याची ओळखही बदलविणार, असे नि:संदिग्ध आश्वासनही अम्ब्रीशरावांनी दिले.राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर गडचिरोलीत प्रथम आगमन झाल्यावर येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे होते. मंचावर विशेष अतिथी म्हणून खासदार अशोक नेते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, भाजपचे संघटन मंत्री आशिष वांदिले, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार आदी उपस्थित होते. यावेळी खासदार अशोक नेते यांनी केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाचे शासन असून जिल्ह्यात तीन आमदार पैकी एक राज्यमंत्री सद्य:स्थितीत असल्याने मागील १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर विकासाभिमुख मागण्यांची पूर्तता होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. डॉ. देवराव होळी यांनी राज्यमंत्री अम्ब्रीशराव महाराज यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्व भागाच्या विकासाला चालना मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. जिल्ह्यातील धान उत्पादकांनाही भाव देण्याच्या दृष्टीने राज्यमंत्री प्रयत्नशिल आहेत, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अम्ब्रीशराव महाराज यांनी सडक, पाणी, वीज या प्रमुख मागण्यांचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जातील व या जिल्ह्यातील स्थानिकांना नोकरभरतीतसुध्दा घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. प्रास्ताविक व संचालन प्रशांत भृगुवार तर आभार प्रशांत वाघरे यांनी मानले. याप्रसंगी भाजपचे प्रदेश सदस्य प्रमोद पिपरे यांचाही सत्कार करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)