शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी नगर पंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : चामोर्शी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनमानी करीत आहेत. यामुळे चामोर्शी शहराची दुरवस्था झाली आहे, असा ...

ठळक मुद्देपाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंद : मुख्याधिकारी गायब; कचऱ्याचीही उचल केली जात नसल्याचा होत आहे आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनमानी करीत आहेत. यामुळे चामोर्शी शहराची दुरवस्था झाली आहे, असा आरोप करून महिलांनी मंगळवारी नगर पंचायतीवर घागर मोर्चा काढला. नगर पंचायत कर्मचाऱ्यांनीही मुख्याधिकारी यांची तक्रार केली आहे. तर घनकचरा व्यवस्थापनावर काम करणाºया मजुरांनीही संप पुकारला आहे.चामोर्शी शहरातील पथदिवे मागील सहा दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या कालावधीत शहरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचºयाची उचल केली जात नसल्याने शहर कचरामय झाले आहे. घंटागाडी दररोज येत नसल्याने कचरा साचला आहे. कचरा कुठे ठेवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असतानाच मागील पाच दिवसांपासून चामोर्शी शहराचा पाणीपुरवठा बंद पडला आहे. परिणामी महिलांना ऐन दिवाळीच्या कालावधीत पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी नगर पंचायतीवर मोर्चा काढला. मात्र मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने तहसीलदारांना फोन केला. तहसीलदार एस.के.बावणे यांनी नगर पंचायतीमध्ये येऊन निवेदन स्वीकारले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळवून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिले. मोर्चाचे नेतृत्व सपना बुरांडे, आशा सोमनकर, गीता सिडाम, मनीषा शेंडे, सुमन सातपुते, शारदा सातपुते, कौशल्या बुरांडे, अल्का सातपुते, सुलभा लटारे, प्रतिभा कोटांगले, उमाबाई गज्जलवार, पार्वता मडावी, पारस परचाके, वंदना उंदीरवाडे, उपासना परचाके, शारदा सातपुते, आशा कुलसंगे, मैनाबाई सातपुते, सुरेखा सातपुते, गीता परचाके, वंदना परचाके, जिजा बन्सोड यांनी केले. मोर्चात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. चामोर्शी शहरातील सोयीसुविधा न पुरविल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर नगर पंचायतीला कुलूप ठोकण्याचाही इशारा संपातील महिलांनी तहसीलदारांना दिला आहे.घनकचरा कर्मचारी संपावरघनकचरा मजुरांना साप्ताहित सुटी मंजूर करावी, मजुरांच्या संख्येत वाढ करावी, मजुरी स्वत: ठेकेदाराने द्यावी, ईपीएफ बद्दलची माहिती मजुरांना उपलब्ध करून द्यावी, सणांच्या दिवशी सुटी द्यावी, त्या दिवशीची मजुरी कपात करू नये, प्रतिदिवस ३०० रूपये मजुरी द्यावी, साप्ताहिक सुटी मंजूर करून त्या दिवसाची मजुरी द्यावी, काही समस्या उद्भवल्यास ठेकेदाराशी संपर्क साधता यावा, म्हणून त्याचा मोबाईल क्रमांक द्यावा आदी मागण्यांसाठी घनकचरा व्यवस्थापनावरील कर्मचाºयांनी सामूहिक संप पुकारला आहे.

टॅग्स :Morchaमोर्चा