शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विविध मागण्यांसाठी सुभाषनगर येथे चक्काजाम आंदोलन

By admin | Updated: December 7, 2014 22:51 IST

अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्याबरोबरच या परिसरातील समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने

अहेरी : अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्याबरोबरच या परिसरातील समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुभाषनगर येथे दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. जिमलगट्टा, जारावंडी, कसनसूर, गट्टा, कमलापूर, पेरमिली, आष्टी, आसरअल्ली या नवीन तालुक्यांची निर्मिती करावी, हिवाळी अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ घोषित करावा, अहेरी सिरोंचा शहरांना नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा, आलापल्ली-अहेरी-कागजनगर रेल्वे लाईन सुरू करावी, देवलमरी सिमेंट उद्योग, सुरजागड लोह पोलाद उद्योग स्थापन करावे, मुलचेरा येथील चेन्ना सिंचन प्रकल्प सुरू करावा, अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, सिरोंचा तालुक्यात अखंडीत विद्युत पुरवठा करण्यासाठी २४० केव्हीचे विद्युत केंद्र सुरू करावे, लगाम येथे ३३ केव्हीचे विद्युत केंद्र सुरू करावे, सुभाषनगर, आलापल्ली येथील पाणी समस्या सोडविण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात यावी, चेन्ना सिंचन प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करावे, पर्लकोटा, गडअहेरी दिना नदीवरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, आशा वर्करला ५ हजार रूपये मानधन देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी सुभाषनगर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन तास चक्काजाम केल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली. आंदोलकांची आक्रमकता लक्षात घेऊन नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी घटनास्थळ गाठून आंदोलकांचे मागण्या ऐकून घेतल्या त्यानंतर निवेदन स्वीकारले. आंदोलनाचे नेतृत्व अहेरी जिल्हा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, अतुल उईके, पवन कोसरे, राहुल मडावी, अतुल नागूलवार, सुनील मडावी, निमकर कुमरे, राकेश मेश्राम, राजू तोरेम, मंगेश आत्राम, संयज आत्राम, संजय मडावी, सुरेश सडमेक, राकेश तोरेम, संतोष कुळमेथे, बाजीराव कुमरे, सलमान शेख, इमाम शेख, वाजिद शेख, निसार शेख, नुस्तफा शेख, चैकी तलांडे यांनी केले. आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले. (प्रतिनिधी)