शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

अखंडित वीज पुरवठ्यासाठी चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

कोरचीला देवरी व कुरखेडावरून वीज पुरवठा केला जाते. ३३ केव्ही उपकेंद्राला २० ते २२ केव्ही दाबाचा वीज पुरवठा केला जातो. परिणामी विद्युत ब्रेक होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरची येथे १३२ केव्ही उपकेंद्राची निर्मिती करणे गरजेचे आहे. ढोलडोंगरी येथे २०१२ मध्ये ३३ केव्ही उपकेंद्र सुरू करण्याची परवानगी मिळाली होती. मात्र निधीअभावी उपकेंद्र पूर्ण होऊ शकले नाही.

ठळक मुद्देकोरचीवासीयांचा एल्गार : सकाळी ११ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत चालले जनआंदोलन, लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यात वारंवार खंडीत होणाºया वीज पुरवठ्याला कंटाळून कोरचीसह परिसरातील नागरिकांनी अखेर मंगळवारी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतला. सकाळी ११ वाजतापासून कोरची-कुरखेडा मार्गावरील झनकारगोंदी फाट्याजवळ चक्काजाम आंदोलन करत तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. सकाळपासून सुरू झालेले हे आंदोलन रात्री ८.३० वाजेपर्यंत सुरू होते. नागरिकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.कुरखेडावरून कोरचीला येणारी विद्युत लाईन जंगलातून येते. त्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. बिघाड सापडण्यासह वेळ लागत असल्याने अनेक दिवस नागरिकांना विजेअभावी राहावे लागते.जंगलातून गेलेली लाईन रस्त्याच्या बाजूला शिफ्ट करावी, त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, लाईन शिफ्ट होईपर्यंत देवरीवरून कोरचीला नियमित वीज पुरवठा करावा अशा आंदोलनकर्त्यांची मागण्या होत्या. कोरची हे तालुक्याचे मुख्यालय असून १३३ गावे जुळलेली आहेत.कोरचीला देवरी व कुरखेडावरून वीज पुरवठा केला जाते. ३३ केव्ही उपकेंद्राला २० ते २२ केव्ही दाबाचा वीज पुरवठा केला जातो. परिणामी विद्युत ब्रेक होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरची येथे १३२ केव्ही उपकेंद्राची निर्मिती करणे गरजेचे आहे. ढोलडोंगरी येथे २०१२ मध्ये ३३ केव्ही उपकेंद्र सुरू करण्याची परवानगी मिळाली होती. मात्र निधीअभावी उपकेंद्र पूर्ण होऊ शकले नाही. बीएसएनएलची थ्री-जी सेवा उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी या आंदोलनात लावून धरण्यात आली.या आंदोलनाचे नेतृत्व सर्वपक्षीय तालुका विकास समितीचे अध्यक्ष श्यामलाल मडावी, उपाध्यक्ष नसरूद्दीन भामानी, सचिव नंदकिशोर वैरागडे, प्रतापसिंह गजभिये, मनोज अग्रवाल, आनंद चौबे आदींनी केले. कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, कोरचे ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले हेसुद्धा यावेळी परिस्थितीवर नजर ठेवून होते.महावितरणच्या अधिकाऱ्यांची लिखित हमीदरम्यान महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी दुपारी आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. आठ दिवसांपूर्वीपर्यंत कोरचीसह राज्यभरात मोठ्या प्रमाणात कृषी पंपांचा वापर वाढला होता. त्यामुळे कमी दाबाचा पुरवठा निर्माण झाला होता. कोरचीसह तालुक्याला नियमित वीज पुरवठा होईल, यासाठी महावितरण कटिबद्ध आहे. रस्त्याच्या बाजूने वीज लाईन टाकण्यासाठी तसा प्रस्ताव महावितरणकडे पाठविला जाईल, असे आश्वासन बोरसे यांनी दिले. मात्र आंदोलनकर्ते लिखित दिल्याशिवाय मानायला तयार नव्हते. अखेर रात्री ८.३० च्या सुमारास अधीक्षक अभियंता बोरसे यांनी १० दिवसांचा अवधी द्या, यावर काहीतरी मार्ग काढू. तोपर्यंत चिचगड-देवरीमार्गे वीज पुरवठा सुरळीत ठेवू, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.आमदारांचा शिष्टाईचा प्रयत्नहे आंदोलन सुरू झाल्यानंतर आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे हेसुद्धा आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी काही वेळ आंदोलनस्थळी थांबून मागण्या रास्त असल्याचे सांगितले. तसेच वीज पुरवठ्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाकडे मागणी केली असून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. परंतू आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही आणि हे आंदोलन रात्रीपर्यंत सुरूच राहिले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज