शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:18 IST

निजामाबाद-सिरोंचा-जगदलपूर या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी राज तुमनूर बसथांब्याजवळ सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देपाच दिवसात दुरुस्तीला सुरुवात करण्याचे आश्वासन : निजामाबाद-जगदलपूर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : निजामाबाद-सिरोंचा-जगदलपूर या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी राज तुमनूर बसथांब्याजवळ सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.निजामाबाद-जगदलपूर हा राष्ट्रीय महामार्गा सिरोंचा तालुक्यातून जातो. सिरोंचा तालुक्याला लागून तेलंगणा राज्यात कालेश्वराचे मंदिर आहे. तसेच तेलंगणाच्या वतीने मेडीगड्डा धरणाचे बांधकाम सुरू आहे. ही दोन्ही स्थळे पाहण्यासाठी अनेक नागरिक सिरोंचा तालुक्यात येतात. मात्र धर्मपुरी ते आसरअल्ली दरम्यान जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. चारचाकी व दुचाकी वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. महामार्गाच्या दुरूस्तीसाठी निवेदन देण्यात आले. मात्र मार्गाच्या दुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. ८ फेब्रुवारीला निवेदन देऊन १० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र प्रशासनाने मार्ग दुरूस्तीबाबतची कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे तुमनूर बसथांब्यावर १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून आंदोलन करण्यात आले. चक्काजाम आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन दोन्ही बाजूची वाहतूक बंद पडली होती.सिरोंचाचे प्रभारी तहसीलदार हमीद सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक योगेश घारे, बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. चार ते पाच दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले. अधिकाºयांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात काळीपिवळी वाहनचाकल, अ‍ॅटोचालक आदी उपस्थित होते. चार ते पाच दिवसांत मार्गाची दुरूस्ती न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.आंदोलनाला नवरदेवाचाही पाठिंबासकाळी ११ वाजेपासून आंदोलनाला सुरुवात झाली. जवळपास एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान वाहनांची मोठी रांग लागली होती. याचवेळी एक वरात लग्न कार्यासाठी जात होती. आंदोलनाचा फटका वरातीलाही बसला. आंदोलन संपेपर्यंत वरातीला थांबावे लागले. नवरदेवाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आंदोलनाला आपलाही पाठिंबा जाहीर केला.