चामोर्शी बाजार समिती : परमानंद मल्लिक उपसभापतिपदी अविरोधचामोर्शी : जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी अतुल गंगाधरराव गण्यारपवार यांची अविरोध निवड करण्यात आली तर उपसभापतिपदी परमानंद मल्लिक यांची निवड झाली आहे.शनिवारी दुपारी २ वाजता बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. अतुल गण्यारपवार यांच्या गटाचे सर्वच संचालक दणदणीत मतांनी विजयी झाल्यामुळे ते सभापतिपदी विराजमान होतील, हे निश्चित होते. त्यानुसार सभापतिपदासाठी अतुल गण्यारपवार व उपसभापतिपदासाठी परमानंद मल्लीक यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. दोनच नामांकन पत्र आल्याने दोघांचीही अविरोध निवड घोषित करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. एस. धोटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आर. जी. ठाकरे यांनी काम पाहिले.यावेळी सभागृहात संचालक सुधाकर निखाडे, अरूण बंडावार, गोसाई सातपुते, जानकीराम कुसनाके, शंकर वंगावार, कौशल्या पोरटे, बैनाबाई मडावी, विनायक आभारे, गणपती भंडारे, निकेश गद्देवार, रामचंद्र ब्राह्मणकर, सतीश रॉय, श्यामराव लटारे, अनिल नैताम, अमोल गण्यारपवार आदी उपस्थित होते. चंद्रकांत दोषी, बाजीराव गावडे हे दोन संचालक सभेला गैरहजर होते. या निवडणुकीदरम्यान माजी आ. नामदेवराव उसेंडी, हसनअली गिलानी, प्रभाकर वासेकर, रामचंद्र गोटा, वैभव भिवापुरे, विनोद खोबे, रमेश नैताम, राजू आत्राम, विठ्ठल कुनघाडकर, सुरेश नैताम, प्रभाकर कुमरे, सुमेध तुरे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
गण्यारपवार बाजार समितीच्या सभापतिपदी
By admin | Updated: September 27, 2015 01:03 IST