शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भातील पूरपरिस्थितीची केंद्रीय पथक करणार पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 08:31 IST

पूर्व विदर्भात पूर परिस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी गावात आणि शेतात शिरल्याने सर्वत्र हाह:कार उडाला. त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी येत्या ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान केंद्रीय पथक येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मध्यप्रदेशातील संजय सरोवर आणि भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने पूर्व विदर्भात पूर परिस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी गावात आणि शेतात शिरल्याने सर्वत्र हाह:कार उडाला. त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी येत्या ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान केंद्रीय पथक येणार आहे.एक पथक चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तर दुसरे पथक नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्याला भेटी देईल. पूरपरिस्थितीमुळे झालेल्या विविध प्रकारच्या नुकसानाची हे पथक पाहणी करणार आहे. त्यात केंद्र शासनाच्या विविध विभागातील सहसचिव, संचालक यांचा समावेश राहील.

गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील गावांना भेटी देवून शेतीचे, घरांचे तसेच इतर सार्वजनिक मालमत्तेचे किती नुकसान झाले त्याचे हे पथक प्रत्यक्ष गावात जावून पाहणी करून आढावा घेणार आहे. सद्या कोरोना स्थितीमुळे आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या पथकाच्या भेटीदरम्यान गावस्तरावर नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.केंद्रीय पथक काही गावांमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष पूरबाधितांच्या शेतात, घरात जाऊन संवाद साधतील. गावस्तरावर फक्त सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांना पथक दाखल झाल्यानंतर उपस्थित राहावे लागणार आहे. अजून नुकसानीचे पंचनामे सुरूच आहेत.

टॅग्स :floodपूर