शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींची जातनिहाय जनगणना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 01:42 IST

अनुसूचित जाती- जमातींप्रमाणे ओबीसींची जातनिहाय आकडेवारी घोषित करून लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी ओबीसी महासंघ देसाईगंजच्या वतीने राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहासंघाची मागणी : देसाईगंजच्या एसडीओंमार्फत राष्ट्रपतींना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : अनुसूचित जाती- जमातींप्रमाणे ओबीसींची जातनिहाय आकडेवारी घोषित करून लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी ओबीसी महासंघ देसाईगंजच्या वतीने राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, मंडल आयोगाच्या १३ व्या शिफारशींनुसार ओबीसीना २७ टक्के आरक्षण १९९२ ला देण्यात आले. बहुसंख्य समाजाची जातनिहाय जनगणनेची आकडेवारी नसल्याने ओबीसी समाजाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही. त्यामुळे ओबीसी समाजाची सामाजिक, शैक्षणिक , आर्थिक स्थिती हलाखीची आहे. बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. जिल्ह्यामध्ये ५० टक्केच्यावर ओबीसी समाज असूनही त्यांचे आरक्षण कमी करून १९ टक्यावरून ६ टक्के करण्यात आले. जिल्हात बहुतांश गावात गैरआदिवासी बहुसंख्येने असताना देखील सदर गाव पेसामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे बहुसंख्य गैर आदिवासी असलेली गावे पेसातून वगळावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सोय उपलब्ध करावी. तसेच त्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी, इतरांप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांनासुद्धा स्वाधार योजना लागू करावी. ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, नॉन - क्रिमीलेअरची अट रद्द करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता. सदर मागण्या पूर्ण न झाल्यास ओबीसी समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने देण्यात आला.निवेदन देताना जि. प. सदस्य रमाकांत ठेंगरे, लोकमान्य बरडे, सागर वाढई, नितीन राऊत, सुनील पारधी कमलेश बारस्कर, कैलास पारधी, प्रा. दामोधर सिंगाडे, हिरालाल शेंडे, चक्रधर पारधी, गौरव नागपूरकर, शंकर पारधी, नेताजी सुंदरकर, रामजी धोटे, दीपक प्रधान, प्रा. परशुरामकर, सतीश खरकाटे, ज्ञानेश्वर कावासे, शालिकराम नाकतोडे, मोहन बगमारे, प्रमोद झिलपे यांच्यासह बहुसंख्य ओबीसीबांधव उपस्थित होते.