देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुरुड या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच,सदस्य यांनी गावातील विकासकामांना सुरुवात केली आहे. गुरूवारी ११ वाजताच्या सुमारास विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कुरुड येथील प्रभाग क्रमांक ०४ मधील आंबेडकर चौकाचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे, विश्वनाथ दिघोरे ते विजय पारधी यांच्या घरापर्यंत सिमेंट-काँक्रिट रस्ता बांधकाम व नाली बांधकाम इत्यादी कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे जिल्हा वार्षिक योजनेतून घेण्यात आली असून या कामांवर प्रत्येकी १० लाख रुपये एवढा निधी खर्च हाेणार आहे. यावेळी सरपंच प्रशाला गेडाम,उपसरपंच क्षितिज उके, ग्रामविकास अधिकारी संजय चलाख, ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम,रेखा मडावी, शंकर पारधी, विलास पिलारे,पटूलदास मडावी, पूजा डांगे, आशा मिसार, प्रतिभा उईके, प्रवीण उईके, प्रीती मडावी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष तुलाराम लाकडे, विलास गोटेफोडे,संजय मिसार,भरत ढोरे,शांता गणवीर, विकास उरकुडे आदी उपस्थित हाेते.
कुरुडमध्ये हाेणार सिमेंट काॅंक्रिटचे रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:42 IST