शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

जिल्हा कारागृहात उत्साहात साजरी झाली गुरुपौर्णिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:59 IST

श्री श्री रविशंकर गुरुजी प्रणीत आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेच्या पुढाकाराने जिल्हा कारागृहात मंगळवारी गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच मागील सात दिवसांपासून कारागृहात कैद्यांसाठी सुरू असलेल्या आर्ट आॅफ लिव्हिंगच्या आनंद अनुभूती शिबिराचीही सांगता करण्यात आली.

ठळक मुद्देआर्ट आॅफ लिव्हिंगचा पुढाकार : कैद्यांसाठी आयोजित आनंद अनुभूती शिबिराचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : श्री श्री रविशंकर गुरुजी प्रणीत आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेच्या पुढाकाराने जिल्हा कारागृहात मंगळवारी गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच मागील सात दिवसांपासून कारागृहात कैद्यांसाठी सुरू असलेल्या आर्ट आॅफ लिव्हिंगच्या आनंद अनुभूती शिबिराचीही सांगता करण्यात आली.जिल्हा कारागृहात गुरुपौर्णिमा उत्सवानिमीत्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कारागृह अधीक्षक बी. सी. निमगडे होते. तसेच तुरुंग अधिकारी चोपकर, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी नितीन हेमके, आर्ट आॅफ लिव्हिंगच्या योगशिक्षिका अंजली कुळमेथे, माधुरी दहिकर, गडचिरोली वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, किशोर खेवले आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुपूजन करण्यात आले. त्यानंतर सुमधुर भजन सादर करण्यात आले.कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रभारी कारागृह अधीक्षक निमगडे म्हणाले की, आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने कैद्यांसाठी घेण्यात आलेल्या आनंद अनुभूती शिबिराचा सर्वांनाच लाभ झाला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला अतिशय मानाचे स्थान आहे. आपल्या आयुष्यात कुठल्या रूपात गुरू येईल हे कुणी सांगू शकत नाही. म्हणून गुरुजनांचा सन्मान करणारी ही गुरुपौर्णिमा प्रत्येकाने साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात वनपरिक्षेत्राधिकारी हेमके व इतर मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले. आर्ट आॅफ लिव्हिंगच्या आनंद अनुभूती शिबिरात सहभागी झालेल्या कैद्यांनी आपले अनुभव कथन केले. या शिबिराच्या माध्यमातून सकारात्मक जगण्याची ऊर्जा मिळाली असून उर्वरित आयुष्य हा सकारात्मक आनंद सर्वांना वाटण्यासाठी घालवू. योग, प्राणायाम, ध्यानाचे महत्त्व इतरांना सांगून त्यांना सुदर्शन क्रियेचा लाभ मिळवून देऊ, असा निर्धार कैद्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमानंतर कारागृह परिसरात मान्यवरांच्या हस्ते पिंपळाचे रोप लावण्यात आले. तसेच भजन मंडळाच्या भक्तीगीतांचा कार्यक्रमही पार पडला. या कार्यक्रमाला आर्ट आॅफ लिव्हिंग परिवाराचे सदस्य, जिल्हा कारागृहाचे कर्मचारी व कैदी उपस्थित होते.