शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकात लागले सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 23:30 IST

बसस्थानकात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर वॉच राहावा या उद्देशाने एसटी विभागाने गडचिरोली बसस्थानकात सुमारे नऊ सीसीटीव्ही कॅमेरे चार दिवसांपूर्वी बसविले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरांमुळे बसस्थानकावरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देगडचिरोली बसस्थानक : नऊ कॅमेऱ्यांचा राहणार वॉच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बसस्थानकात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर वॉच राहावा या उद्देशाने एसटी विभागाने गडचिरोली बसस्थानकात सुमारे नऊ सीसीटीव्ही कॅमेरे चार दिवसांपूर्वी बसविले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरांमुळे बसस्थानकावरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.बसस्थानक परिसरात प्रवाशी, एसटी कर्मचाऱ्यांची दिवसभर गर्दी राहते. त्यामुळे चोरीसह इतर अनुचित घटना घडतात. या घटनांना आळा घालण्यासाठी बसस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी होत होती. एसटी महामंडळाने राज्यातील जिल्हा स्थळावर असलेल्या बसस्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार गडचिरोली येथील बसस्थानकावर नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. कॅमेरे लावण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी बसस्थानक परिसराची पाहणी केली. एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून कॅमेरे लावण्याची जागा निश्चित केली. त्यानंतर मंगळवारी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कॅमेराची रेंज ८० मीटर आहे. आठ कॅमेरे फिक्स आहेत. तर एक कॅमेरा फिरणारा राहणार आहे. फिरणारा कॅमेरा बसस्थानकाच्या अगदी समोर डाव्या बाजूस लावण्यात आले आहे. या संपूर्ण कॅमेराचे चित्रीकरण बसस्थानक प्रमुखांच्या कक्षात दिसत आहे. प्रत्येक कॅमेराला १८० दिवसांचा बॅकअप देण्यात आला आहे. १८० दिवसांनंतर संबंधित कॅमेरातील डेटा दुसऱ्या सीडीमध्ये अपलोड केल्यानंतर डिलिट केला जाणारा आहे. सहा महिन्यांपूर्वीचा डेटा बघता येणार आहे.फिरत्या कॅमेऱ्याची चौफेर नजरबसस्थानकाच्या अगदी समोर डाव्या बाजूस फिरता कॅमेरा लावण्यात आला आहे. सदर कॅमेरा बसस्थानकाच्या समोरील भाग आपल्या नजरेत ठेवणार आहे. विशेष म्हणजे, सदर कॅमेरा फिरता असल्याने बºयाचशा भागावर या कॅमेराची नजर राहणार आहे. बसस्थानकात चौकशी विभागासमोरही स्वतंत्र कॅमेरा बसविण्यात आला आहे. त्यामुळे घटनांवर नियंत्रण राहणार आहे.