शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाला बांधकामाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:13 IST

शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टानजीक असलेल्या किष्टापूर येथे शेतकरी मंगा सम्मा सिडाम या लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभागाच्या वतीने सन २०१६-१७ मध्ये माती नाला बांधकाम करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे या माती नाल्यात अतिरिक्त पाणी जमा झाल्यामुळे पाण्याचा दाब वाढला. परिणामी लगतच्या शेतीमध्ये पाणी साचले. रोवणी केलेले धानपीक वाहून गेले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहेत.

ठळक मुद्देरोवणी केलेले धान पीक वाहून गेले : जिमलगट्टानजीकच्या किष्टापुरातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टानजीक असलेल्या किष्टापूर येथे शेतकरी मंगा सम्मा सिडाम या लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभागाच्या वतीने सन २०१६-१७ मध्ये माती नाला बांधकाम करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे या माती नाल्यात अतिरिक्त पाणी जमा झाल्यामुळे पाण्याचा दाब वाढला. परिणामी लगतच्या शेतीमध्ये पाणी साचले. रोवणी केलेले धानपीक वाहून गेले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहेत.किष्टापूर येथील मुत्ता मदन सिडाम व मलय्या मदना सिडाम या शेतकºयांनी आपल्या शेतजमिनीत धान पिकाची रोवणी केली होती. ही शेती पूर्णपणे पाण्याखाली आल्याने त्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्व प्रकाराला कृषी विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप किष्टापूरचे सरपंच रोशन सिडाम यांनी केला आहे. माती नाला बांधकाम करताना अतिरिक्त पाणी जाण्यासाठी सुविधा करणे आवश्यक होते. मात्र या नाल्याला वेस्टवेअर दिला नाही. त्यामुळे या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊन शेतकºयांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी, सिंचन व वन विभागामार्फत कोट्यवधी रूपयांची कामे केली जातात. या कामासाठी शासनाकडून संबंधित विभागाला वार्षिक उद्दिष्ट प्राप्त होत असते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या उद्देशाने अधिकारी नियोजन शुन्यतेने नाला व इतर बांधकाम करतात, हे या कामावरून दिसून येत आहेत. या बाबीची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाºयांनी नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.शेतकऱ्यांना विश्वासात न घेता केले बांधकामकृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थी व लगतच्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता माती नाला बांधकाम केले. अधिकाऱ्यांच्या नियोजन शुन्यतेमुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याला अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप किष्टापूरचे सरपंच रोशन सिडाम यांनी केला आहे.