शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जातनिहाय जनगणना होणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:58 IST

ओबीसींची जातनिहाय जनगणना भारतीय संविधानानुसार आजतागायत झालेली नाही. शासनाच्या वतीने सन २०११ मध्ये जनगणना करण्यात आली. मात्र ही जनगणना जातनिहाय असल्याचे अद्यापही जाहीर करण्यात आले नाही.

ठळक मुद्देज्ञानेश्वर गोरे यांचे मत : संविधानिक न्याय यात्रेतून संपूर्ण महाराष्टÑात ओबीसी जागर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ओबीसींची जातनिहाय जनगणना भारतीय संविधानानुसार आजतागायत झालेली नाही. शासनाच्या वतीने सन २०११ मध्ये जनगणना करण्यात आली. मात्र ही जनगणना जातनिहाय असल्याचे अद्यापही जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे ओबीसींवर सातत्याने अन्याय होत आहे. जातनिहाय जनगणना करून ती जाहीर केल्यास ओबीसी प्रवर्गातील विविध पोटजातीत विभागलेल्या सर्व कुटुंबांचा आर्थिक स्तर तंतोतंत कळणार आहे. जातनिहाय जनगणनेतून ओबीसींचे बहुतांश प्रश्न सुटतील, असे मत ओबीसी शोषित संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी मांडले.भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेच्या वतीने ११ एप्रिलपासून समताभूमी फुलेवाडा येथून संविधानिक न्याययात्रा काढण्यात आली असून ही यात्रा २८ एप्रिलला शनिवारी गडचिरोलीत पोहोचली. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संविधानिक न्याययात्रेतून महाराष्ट्रातील समस्त ओबीसींना आपल्या अधिकार व हक्काप्रती जागृत करण्याचे काम केले जात आहे, असे प्रा. गोरे यांनी यावेळी सांगितले. सदर संविधानिक न्याययात्रा संपूर्ण महाराष्ट्रात निघणार आहे. सदर यात्रा गडचिरोलीत शनिवारी पोहोचल्याचा हा १८ वा दिवस आहे. विविध सात संघटनांनी एकत्र येऊन ही यात्रा काढली आहे, असे प्रा. रमेश पिसे यांनी सांगितले. याप्रसंगी प्रा. शेषराव येलेकर यांनी सदर संविधानिक न्याययात्रेतून शासनावर दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. सर्वांची जातनिहाय जनगणना करून ती जाहीर करण्यात यावी, जेणेकरून खऱ्या मागासवर्गीयांना शासकीय सवलतीचा लाभ देणे सुलभ होईल.११ मे रोजी चैत्यभूमी दादर मुंबई येथे या न्याययात्रेचा ५० हजार लोकांच्या उपस्थितीत समारोप होईल, असे पदाधिकाºयांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सुनीता काळे, माया गोरे, प्रा. देवानंद कामडी, दादाजी चापले, सुरेश भांडेकर, गोवर्धन चव्हाण, प्राचार्य खुशाल वाघरे, अरूण मुनघाटे, रमेश भुरसे आदी उपस्थित होते.