शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

वृक्षतोड झाल्यास ‘चिपको आंदोलन’ करू

By admin | Updated: February 20, 2016 02:14 IST

सावलखेडा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ३० व ३२ वनक्षेत्रातील १० हजार हेक्टर जागेवरील जंगलाची ग्रामसभेची परवानगी न घेता ...

वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीकुरखेडा : सावलखेडा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ३० व ३२ वनक्षेत्रातील १० हजार हेक्टर जागेवरील जंगलाची ग्रामसभेची परवानगी न घेता वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अवैधरित्या वृक्षतोड केली आहे. या वृक्षतोडीस सावलखेडावासीयांना थांबविले. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व पुन्हा वृक्षतोड केल्यास ‘चिपको आंदोलन’ करणार असल्याची माहिती बुधवारी कुरखेडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत वनहक्क सनियंत्रण समितीचे अध्यक्ष यशोधन मडावी, सचिव भास्कर दडमल, माजी सरपंच पुरूषोत्तम दडमल, काशिनाथ दोनाडकर, वनहक्क समितीचे अध्यक्ष गुणवंत दडमल, सचिव धोंडूजी धोटे, नानाजी पुराम, गजानन ढोक, सुभाष ढोरे, यशवंत कुथे, लोकनाथ उईके, मुखरू राऊत, दिलेश्वर कवाडकर, शालीक कुमरे, रोशन चौधरी यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत सावलखेडावासीय म्हणाले की, अधिनियम १९९६ व अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी वनहक्काची मान्यता सन २००८ सुधारित नियम २०१२ अंतर्गत मान्यता प्राप्त ग्रामसभा सावलखेडाच्या पारंपारिक सीमाअंतर्गत वनक्षेत्रातील उत्कृष्ट जंगालाची, वन्यप्राण्यांचे आश्रय असलेल्या व गौण वन्यजैवांची वन विकास महामंडळाने ग्रामसभेची परवानगी न घेता वृक्षतोड करून गा्रमसभेच्या अधिकाराची पायमल्ली केली आहे. त्यामुळे वन विकास महामंडळाने सुरू केलेली वृक्षतोड संपूर्ण गावकऱ्यांनी मिळून ३१ जानेवारीला थांबविली. त्याअनुषंगाने १६ फेब्रुवारी रोजी वन विकास महामंडळाचे अधिकारी आणि गावकऱ्यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी आरमोरीचे ठाणेदार सुभाष ढवळे यांच्या उपस्थितीत येथील मंदिरात ग्रामसभा बोलाविली होती. या सभेत कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र ठाणेदार ढवळे यांनी तुम्ही जर काम अडविले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील, अशी धमकी दिली. एकूणच वन महामंडळाची यंत्रणा पोलिसांना हाताशी धरून वृक्षतोड करण्याचा प्रयत्न करीत आहे. असे झाल्यास चिपको आंदोलन केले जाईल, असेही ग्रामस्थ म्हणाले.