शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

सिझेरियनचा खर्च परवडेना? जननी सुरक्षा योजनेची घ्या मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 15:13 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल गर्भवतींना लाभ : गरजूंना मिळतोय दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत २००५-०६ यावर्षी सुरू केलेल्या जननी सुरक्षा योजनेंतर्गत गरीब व गरजू गर्भवतींना आर्थिक लाभ देण्यात येतो. घरी किंवा दवाखान्यात प्रसूती झाली तरीही महिलांना आर्थिक साहाय्य केले जाते. अनेकदा सिझेरियनचा खर्च आवाक्याबाहेर असतो. मात्र, या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना हातभार लागत आहे.

सुरुवातीला ही योजना फक्त ग्रामीण भागातील महिलांना देण्यात येत होती. मात्र, नंतर ती नागरी भागातही लागू करण्यात आली. या योजनेत दारिद्र्यरेषेखालील तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या गर्भवती मातांनाही आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे गरजूंना याचा आधार होत आहे.

'डीबीटी'द्वारे थेट खात्यात पैसे

  • जननी सुरक्षा योजनेंतर्गत थेट गर्भवती मातांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात. 
  • अर्ज घेतानाच सोबत बँक अकाउंट, आधारकार्ड व इतर तपशील घेतला जातो. त्यानंतर डीबीटीद्वारे बँक खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे यात पारदर्शकता आहे.

माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी योजना राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील गरीब महिलांचे आरोग्य संस्थांमध्ये होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण वाढविणे व माता व अर्भक मृत्यू रोखणे.

अटी व शर्ती काय?

  • दारिद्रयरेषेखालील सर्व लाभार्थी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सर्वे गर्भवती माता (दारिद्र्यरेषेखाली नसलेल्यादेखील) 
  • सदर लाभार्थी महिलेचे वय प्रसवपूर्व नोंदणी करताना कमीत कमी १९ वर्षे असावे. सदर योजनेचा लाभ दोन जिवंत अपत्यांपर्यंतच देय राहील.

अर्ज कुठे करायचा? सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, नगरपालिका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, शासनमान्य खाजगी रुग्णालये या ठिकाणी योजनेचा लाभ देण्यात येतो.

किती रुपये मिळतात?शहरी भाग - ६०० रुपये ग्रामीण भाग - ७०० रुपये सिझेरियन - १५०० रुपये 

जननी सुरक्षा योजनेचे लाभार्थी प्रवर्ग                          लाभार्थी                    लाभ वितरित लाभार्थी एस.सी.                         ७८३                               ७०८ एस.टी.                         ३५८८                             ३२८२ बीपीएल                        ११७२                             १०८४ एकूण                           ५५४३                            ५०७४

"राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या जननी सुरक्षा योजनेचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आहेत. शासकीय रुग्णालयांसह घरी प्रसूत झालेल्या महिलांनाही याद्वारे लाभ देण्यात येत आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब तसेच गरजू कुटुंबांना यामुळे आधार मिळत आहे. या मातांसह बाळांच्या आरोग्याची देखील व्यवस्थित काळजी घेतली जात आहे."- डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीgovernment schemeसरकारी योजना