शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक वाघिणीला नागपुरातील गोरेवाड्याला पाठविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:29 IST

दोन नागरिकांसह चार पाळीव जनावरांचा बळी घेतलेल्या नरभक्षक वाघिणीला आरमोरी तालुक्यात रवी-अरसोडा दरम्यानच्या जंगल परिसरात.....

ठळक मुद्देवनाधिकाºयांची माहिती : दोन नागरिक व चार जनावरांचा घेतला होता बळी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : दोन नागरिकांसह चार पाळीव जनावरांचा बळी घेतलेल्या नरभक्षक वाघिणीला आरमोरी तालुक्यात रवी-अरसोडा दरम्यानच्या जंगल परिसरात शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शॉर्पशुटर व वन विभागाच्या चमूने जेरबंद केले. या नरभक्षक वाघिणीला नागपूर येथील गोरेवाडा रिसोर्स सेंटर येथे रविवारी पाठविण्यात आले. नरभक्षक वाघीण जेरबंद झाल्याने देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.आरमोरी तालुक्यातील रवी, अरसोडा जंगल परिसरात तसेच देसाईगंज तालुक्याच्या कुरूड कोंढाळा भागात गेल्या सहा महिन्यांपासून वाघिणीची दहशत कायम होती. त्यामुळे या भागातील नागरिक भितीमुळे सायंकाळी व पहाटेच्या सुमारास बाहेर पडत नव्हते. वाघाच्या दहशतीमुळे या भागातील शेती मशागतीची कामे प्रभावित झाली होती. शॉर्पशुटर दोनदा बोलविण्यात आले. मात्र वाघिण सापडली नाही. त्यानंतर पुन्हा तिसºयांदा वन विभागाने शॉर्पशुटरची चमू बोलाविली. दरम्यान चमूने शर्थीचे प्रयत्न करून नरभक्षक वाघिणीला शनिवारी जेरबंद केले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.फुटेज पाहून झाली ओळखवनाधिकाºयांनी दुपारच्या सुमारास या वाघिणीला पिंजºयामध्ये कैद करून नागपूर येथील गोरेवाडा सेंटरमध्ये घेऊन गेले. यावेळी वनाधिकारी चौडीकार, नरेंद्र चांदेकर, क्षेत्र सहायक मेनेवार, ठाकरे व दोन वनमजूर उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून ज्या ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्या. त्या ठिकाणचे निरिक्षण करण्यात आले. घटनास्थळाजवळ लावण्यात आलेले कॅमेराचे फुटेजही पाहण्यात आले. याच वाघिणीने तीन लोकांवर हल्ला केला, असे वडसाचे आरएफओ नरेंद्र चांदेकर यांनी सांगितले. सदर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन कर्मचाºयांचेही मोलाचे सहकार्य लाभले.