शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

आविसंने निवडला चिठ्ठी टाकून सभापतीचा उमेदवार

By admin | Updated: March 31, 2017 01:06 IST

आदिवासी विद्यार्थी संघाला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यावर्षी अहेरी विधानसभा क्षेत्रात प्रचंड मोठे यश मिळाले आहे.

कुटुंबात पद न घेतल्याने : दीपक आत्राम यांची राजकीय उंची वाढलीगडचिरोली : आदिवासी विद्यार्थी संघाला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यावर्षी अहेरी विधानसभा क्षेत्रात प्रचंड मोठे यश मिळाले आहे. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या राजकारणाला शह देऊन आविसंने या मतदार संघात आपला पाया मजबूत केला आहे. यासोबतच एवढे मोठे यश मिळाल्यावरही माजी आ. दीपक आत्राम यांनी आपल्या सौभाग्यवतींचे नाव सभापती पदाच्या यादीतून डिलिट करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पत्नीला सभापती पदाची संधी दिली. यामुळे आविसंसह दीपक आत्राम यांची राजकीय उंची वाढल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये उमटली आहे.आदिवासी विद्यार्थी संघाकडून यंदा सात सदस्य जिल्हा परिषदेवर निवडून आले आहे. यामध्ये पाच महिला आहेत व दोन पुरूष सदस्य आहेत. आविसंला भाजपसोबत गडचिरोली जिल्हा परिषदेत सत्तेमध्ये बसण्याची संधी मिळाली. आविसंचे नेते अजय कंकडालवार हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून विराजमान झाले आहे. आविसंला महिला व बालकल्याण विभागाचे सभापतीपदही मिळाले. या पदावर माजी आ. दीपक आत्राम आपल्या पत्नी अनिता आत्राम यांना विराजमान करतील, अशी सर्व राजकीय नेत्यांना व अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनाही आशा होती. बहुतांशी राजकीय नेते आपल्या कुटुंबातील सदस्यांनाच पद देण्याची भूमिका घेतात. हीच रि दीपक आत्रामही ओढतील, असे वाटत असताना सभापती पदाचा उमेदवार निवडताना दीपक आत्राम यांनी आपल्या पत्नी अनिता आत्राम यांचे नाव वगळून उर्वरित चार महिला सदस्यांच्या नावाची चिठ्ठी जिल्हा परिषदेतच टाकायला सांगितली. त्यातील एक चिठ्ठी उचलून त्यांनी जयसुधा बानय्या जनगाम यांचे नाव सभापती पदाचे उमेदवार म्हणून निश्चित केले. दीपक आत्राम यांची ही राजकीय खेळी आविसंच्याही अनेक कार्यकर्त्यांना धक्का देऊन गेली. भाजपला या निर्णयाची माहिती मिळताच त्यांनाही याचे आश्चर्य वाटले. दीपक आत्राम यांनी आपल्या कुटुंबातील सदस्याला पद नको, अशी भूमिका घेतल्यामुळे दीपक आत्राम यांची राजकीय उंची वाढली आहे.बहुतांश राजकीय नेते कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यापासून ते निवडून आल्यानंतर पद देण्याबाबत आग्रही भूमिका घेत असतात. गडचिरोली जिल्ह्याचेही राजकारण याला अपवाद नाही. मात्र माजी आ. दीपक आत्राम यांची ही खेळी अनेकांना आश्चर्याचा धक्का देऊन गेली. दीपक आत्राम यांच्या पत्नी अहेरी तालुक्यातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आहेत. त्यांना सभापती पद मिळेल, असे वाटत असताना दीपक आत्राम यांनी मात्र पत्नीचा पत्ता कापला. (जिल्हा प्रतिनिधी)