शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

- तर कमलापुरातील हत्तीकॅम्प स्थलांतराचा निर्णय रद्द करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:03 IST

कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये असलेल्या हत्तींचे तिथे आता काम राहिलेले नाही. तिथे कोणी पर्यटकही हत्तींना पाहण्यासाठी येत नाही. मात्र मंत्रिमहोदयांनी सूचना केल्यास हत्तींना तेथून हलविण्याचा निर्णय रद्द केला जाईल, .....

ठळक मुद्देपीसीसीएफ मिश्रा यांची स्पष्टोक्ती : हत्ती पाहण्यासाठी पर्यटक येत नसल्याचा जावईशोध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये असलेल्या हत्तींचे तिथे आता काम राहिलेले नाही. तिथे कोणी पर्यटकही हत्तींना पाहण्यासाठी येत नाही. मात्र मंत्रिमहोदयांनी सूचना केल्यास हत्तींना तेथून हलविण्याचा निर्णय रद्द केला जाईल, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के.मिश्रा यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना स्पष्ट केले.अहेरी तालुक्यातील कमलापूरच्या हत्ती कॅम्पचे पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करण्याच्या वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) ए.के. मिश्रा यांच्या पत्राने गेल्या आठवडाभरापासून गोंधळ उडाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनराज्यमंत्री अब्रिशराव आत्राम यांनीही हत्तींचे स्थानांतर होऊ दिले जाणार नाही असे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केल्याने कमलापूर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.हत्तींना १५ फेब्रुवारीपर्यंत हलवा, असे निर्देश पीसीसीएफ मिश्रा यांनी पत्रात दिले होते. ती मुदत संपल्याने हत्तींना हलविण्याचा निर्णय रद्द झाला का, याबद्दल मिश्रा यांना विचारले असता ते म्हणाले, निर्णय अद्याप रद्द झालेला नाही. हत्तींना हलविण्यासाठी आणखी १५ ते २० दिवसांची मुदत उपवनसंरक्षकांनी मागितली आहे. दरम्यान जनभावना पाहता वनराज्यमंत्र्यांची हत्तींना हलविण्याबाबत नकारात्मक भूमिका असल्याचे निदर्शनास आणून दिले असता, मंत्रीमहोदयांनी तशी सूचना केल्यास आपला निर्णय मागे घेण्याची तयारी मिश्रा यांनी दर्शविली. मात्र हत्तींना हलविण्याचा निर्णय का घेतला, हेसुद्धा त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वीच्या काळात लाकडांची वाहतूक करण्यासाठी हत्तींचा उपयोग होत होता. पण आता जंगलांची तोडाई बंद आहे. त्यामुळे कमलापूरमध्ये या हत्तींना कोणतेही काम नाही. पेंच प्रकल्पात त्यांना विविध कामे जाऊ शकतात. वाघांचा माग घेण्यासोबतच पावसाळ्यात वनविभागाची कोणतीही वाहने जंगलात वापरू शकत नसताना निगरानीसाठी या हत्तींचा उपयोग होऊ शकतो. त्या ठिकाणी आम्ही पर्यटकांसाठी हत्तींना नेणार नसून आमच्याच कामासाठी नेणार असल्याचे ते म्हणाले. कमलापूरमध्ये हत्ती पाहण्यासाठी कोण पर्यटक येतात? तिथे इतके दिवस हे हत्ती कशासाठी पोसून ठेवले हे मलाच माहित नाही, असा प्रश्नही त्यांनी केला.आज नागपुरात अधिकाऱ्यांसोबत बैठकनागपूरमध्ये शुक्रवारी वनराज्यमंत्री अब्रिशराव आत्राम यांनी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. त्यात हत्ती कॅम्पच्या स्थलांतराबद्दलच्या निर्णयावर चर्चा होणार आहे.जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळाली यासाठी आपण कायम प्रयत्नशिल असल्याचे ते म्हणाले.दरम्यान हत्तींचे स्थलांतर झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिला आहे.काही हत्ती राहू शकतात कमलापुरातप्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या पत्रानुसार कमलापूरच्या सर्वच हत्तींना पेंचमध्ये नेले जाणार आहे. मात्र पर्यटकांचे आकर्षण कायम ठेवण्यासाठी सर्वच्या सर्व हत्ती स्थलांतरित करण्याऐवजी काही हत्ती कमलापुरात ठेवून काही पेंचमध्ये नेण्याचा प्रस्ताव आल्यास त्यावरही विचार करता येईल, असे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली