एसडीआेंना निवेदन : श्रीराम जन्मोत्सव समितीची मागणीअहेरी : आलापल्ली वन विभागात अहेरी उपक्षेत्रांतर्गत कार्यरत क्षेत्रसहाय्यक सी. वाय. तोम्बर्लावार यांची बदली सूड भावनेने व नियमबाह्यपणे करण्यात आली आहे. त्यांची करण्यात आलेली बदली रद्द करून अहेरी उपक्षेत्रात पूर्ववत क्षेत्रसहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती कायम ठेवावी, अशी मागणी श्रीराम जन्मोत्सव समिती अहेरीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. तोम्बर्लावार यांची २२ महिन्याच्या अत्यल्प कालावधीत करण्यात आलेली बदली अधिनियम २००६ अंतर्गत दिलेल्या नियमांचा भंग असून वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांचा गैरवापर करून व्यक्तीगत सूड भावनेने त्यांची बदली केली आहे. तोम्बर्लावार यांनी रूजू झाल्यापासून निस्तार हक्क अंतर्गत जळाऊ बिट, बांबू येथील गरीब जनतेला सहजरित्या उपलब्ध करून दिले. शिवाय रोजगार निर्मितीवरही भर दिला. त्यामुळे त्यांची कामे जनहिताची आहेत. नियमबाह्य प्रकरणाची चौकशी करून दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अन्यथा उपवन संरक्षक कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा समितीने दिला आहे.
तोम्बर्लावार यांची बदली रद्द करा
By admin | Updated: July 3, 2015 01:46 IST