शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सूरजागडच्या खाणीची लीज रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:15 IST

एटापल्ली तालुक्यातील लोह खनिज खाणीची लिज रद्द करून खोदकाम तत्काळ बंद करावे, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन : शेकडो झाडांची कत्तल; काँग्रेसचा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील लोह खनिज खाणीची लिज रद्द करून खोदकाम तत्काळ बंद करावे, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.एटापल्ली तालुक्यात सागवान, बिजा, मोहा, हिरडा, बांबू अशा अनेक प्रजातींचे वृक्ष आहेत. या वृक्षांपासून शासनाला कोट्यवधी रूपयांचा वार्षिक महसूल मिळतो. नागरिकांनाही रोजगार उपलब्ध होतो. असे असतानाही शासनाने लॉयड्स मेटल, जिंदाल, अदानी, अंबानी, मित्तल यासारख्या उद्योगपतींच्या कंपन्यांना नाममात्र दरात लोह खनिजाच्या उत्खननाची लिज दिली आहे. लॉयड्स मेटल कंपनीने सुरू केलेल्या उत्खनन कार्यात कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट झाली आहे. यामुळे शासनाना महसूल बुडाला आहे. त्याचबरोबर वनसंपत्तीचीही मोठी हानी झाली आहे. लोह खनिजाचे उत्खनन बंद करण्यासाठी एटापल्ली तालुका काँग्रेस कमिटी तसेच स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा शासनाकडे निवेदन पाठविले. विनंती अर्ज केले. धरणे आंदोलन, मोर्चे व उपोषण अशी आंदोलने करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र शासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. एटापल्ली तालुक्यात प्रस्तावित असलेल्या व सुरू असलेल्या सर्वच लोह खनिज खाणींची लिज रद्द करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून पदाधिकाºयांनी केली आहे.निवेदन देतेवेळी जि. प. सदस्य तथा काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय चरडुके, सुरेंद्र मडावी, आकाश मट्टामी, रोशन पदा, पंकज वड्डे, बंटी जुनघरे, रोशन मुळमा, गीता कोरचा, उषा गोटा, सुमन काळंगा, काजल गावडे, कोमल वड्डे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व एटापल्ली तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.