शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल कामाला गती येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:35 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाने सर्वसामान्य आदिवासी कुटुंबासाठी शबरी आवास योजना सुरू केली, मात्र सदर योजनेअंतर्गत मंजूर केलेले मागील दोन वर्षातील शेकडो घरकुल अपूर्ण स्थितीत आहेत. चालू वर्षातील मंजूर घरकुलांच्या कामांना गती नसल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देशबरी आवास योजना : दोन वर्षातील अनेक कामे अपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या आदिवासी विकास विभागाने सर्वसामान्य आदिवासी कुटुंबासाठी शबरी आवास योजना सुरू केली, मात्र सदर योजनेअंतर्गत मंजूर केलेले मागील दोन वर्षातील शेकडो घरकुल अपूर्ण स्थितीत आहेत. चालू वर्षातील मंजूर घरकुलांच्या कामांना गती नसल्याचे दिसून येते.आदिवासी विभागाच्या अहेरी, भामरागड, गडचिरोली या तिनही प्रकल्पाअंतर्गत १२ तालुक्यात सदर योजनेअंतर्गत घरकूल मंजूर केले जातात. या घरकूल कामाचा आढावा व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे आहे. सन २०१६-१७ मध्ये शबरी आदिवासी घरकूल योजनेअंतर्गत १२ तालुक्यात एकूण ७९७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले. तेवढेच घरकूल मंजूरही करण्यात आले. यापैकी घरकुलाचे काम पूर्ण केलेल्या ४३४ लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली आहे. ६८८ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली आहे. सन २०१६-१७ या वर्षात एकूण ४६६ घरकुलाचे काम पूर्ण झाले असून पूर्ण झालेल्या कामांची सरासरी टक्केवारी ५८.४७ आहे.सन २०१७-१८ या वर्षात सदर योजनेअंतर्गत एकूण ३०५ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ३०४ घरकुलांना आॅनलाईन मंजुरी प्रदान करण्यात आली. ३०४ पैकी आतापर्यंत केवळ ५७ घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे. ७९ घरकूल लाभार्थ्यांना चौथ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली आहे. सन २०१८-१९ या चालू वर्षात एकूण ३०५ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट असून २६४ घरकुलांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यापैकी १०७ घरकुलांना आॅनलाईन मंजुरी दिली आहे. कागदपत्रे व बँक खाते उघडणाºया २० लाभार्थ्यांना घरकुलाचे काम सुरू करण्यासाठी पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली.