शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कैकाडी वस्तीला विकासाची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 01:38 IST

चामोर्शी मार्गावरील शहरापासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या कैकाडी वस्तीत नगर परिषदेने अजूनपर्यंत कोणत्याही सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.

ठळक मुद्देवीज, रस्ता, पाणी या मूलभूत सुविधांचा अभाव : नगर परिषदेचे मागील सात वर्षांपासून दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी मार्गावरील शहरापासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या कैकाडी वस्तीत नगर परिषदेने अजूनपर्यंत कोणत्याही सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.कैकाडी समाजाचे नागरिक शहरात कुठेही वास्तव्याने राहत होते. तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटने यांनी पुढाकार घेत चामोर्शी मार्गावर शहरापासून काही दूर अंतरावर कैकाडी समाजातील नागरिकांसाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर या समाजाच्या नागरिकांनी त्या ठिकाणी झोपड्या उभ्या केल्या. ही वस्ती वसल्याला जवळपास सात वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र गडचिरोली नगर परिषदेने साधा वीज पुरवठा, नाली, रस्ता यासारख्या मूलभूत सोयीसुविधा सुध्दा उपलब्ध करून दिल्या नाहीत. वस्तीच्या दोन्ही बाजुला घरे आहेत. वस्तीतील मध्यभागी असलेल्या मार्गाचे केवळ माती वजा खडीकरण करण्यात आले आहे. या मार्गाचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटीकरण झाले नाही. रस्त्याच्या बाजुला नाली बांधण्यासाठी खोदकाम झाले आहे. मात्र नाली बांधली नाही. रस्ता उंच करण्यासाठी नालीप्रमाणे खोदकाम करण्यात आले असावे, अशी शक्यता आहे. वीज नसल्याने रात्र अंधारातच काढावी लागते. येथील नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असल्याने काही नागरिकांनी साध्या ताडपत्री अंथरून तर काही नागरिकांनी टिन टाकून झोपड्या तयार केल्या आहेत. या वस्तीत जाण्यासाठी रस्ता नसून पायवाटेने जावे लागते. वस्तीच्या बाहेर शेतात जुनी खासगी विहीर आहे. या विहिरीच्या पाण्यावर सदर कुटुंब आपली तहाण भागवित आहेत.गडचिरोली नगर परिषदेला कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध होतो. यातीलकाही निधी चांगली नाली फोडून त्यावर दुसरी नाली बांधण्यासाठी खर्च केला जातो. मानवी दृष्टीकोन लक्षात घेऊन येथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी होत आहे.निवडणुकीच्या वेळीच फिरकतात उमेदवारकैकाडी वस्तीतील मते मिळावी यासाठी नगर परिषद निवडणुकीसाठी उभे राहत असलेले उमेदवार वस्तीत जाऊन मते मागतात. वस्तीचा विकास करण्याचे आश्वासन दिले जाते. त्यानंतर मात्र नगरसेवकांना या वस्तीचा विसर पडतो. वन विभागाच्या जागेवर सदर घरे असल्याने योजना राबविता येत नाही. असे सांगितले जाते. मात्र इतर वार्डांप्रमाणेच याही वार्डात योजना राबविणे शक्य आहे.