शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांचा संसार सावरून आम्ही भागविताे आपली उपजीविका, ओझा गाेंड समाजाची व्यथा

By गेापाल लाजुरकर | Updated: May 7, 2023 17:00 IST

गडचिरोली तालुक्यांच्या गोविंदपूर येथे ओझा गोंड आदिवासी समाजाचे लोक राहतात. टिनाच्या पत्र्यांपासून संसाराेपयाेगी विविध साहित्य तयार करणे हा मुख्य व्यवसाय आहे.

गडचिराेली : पिढ्यान् पिढ्यांपासून केल्या जाणाऱ्या पारंपरिक व्यवसायाला आता काही प्रमाणात खीळ बसली असली तरी काही जाती-जमाती अजूनही भटकंती करून आपला पारंपरिक व्यवसाय करीत आहेत. काहींचे व्यवसाय डबघाईला आले आहेत. अशातच ओझा गाेंड समाजाचे लाेक अजूनही पिंप, टिन व अन्य लाेखंडी वस्तूंपासून विविध वस्तू तयार करतात. गडचिराेली तालुक्यातील गाेविंदपूर येथील मूळ रहिवासी असलेले ओझा गाेंड समाजबांधव विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाळा साेडून वर्षभर स्थलांतर करतात. संसाराेपयाेगी विविध वस्तू पैशांच्या माेबदल्यात देऊन दुसऱ्यांचा संसार सावरून आम्ही आपली उपजीविका भागवित असल्याची व्यथा समाजबांधवांनी व्यक्त केली.

गडचिरोली तालुक्यांच्या गोविंदपूर येथे ओझा गोंड आदिवासी समाजाचे लोक राहतात. टिनाच्या पत्र्यांपासून संसाराेपयाेगी विविध साहित्य तयार करणे हा मुख्य व्यवसाय आहे. पावसाळ्याचे दिवस वगळता इतर सर्व महिने गावोगावी भटकंती करून टिनपत्र्यांपासून संसाराेपयोगी साहित्य तयार करण्याचा व्यवसाय सुरू असतो. यातून या समाजाला रोजगार मिळताे. टिनपत्रे व टाकाऊ पिंपांपासून ड्रम, कोटी, सूप, चाळणी, कचरा दाणी आदी वस्तू तयार करतात. या वस्तू बनविण्यापोटी ते लाेकांकडून तांदूळ, डाळ व पैशांच्या स्वरुपात माेबदला घेतात. गडचिराेलीसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यातील गावात दिवाळीनंतर ओझा गोंड समाजाचे लोक काही दिवसांसाठी अस्थायी स्वरुपात वास्तव्य करून हा व्यवसाय करतात.आर्थिक स्थिती हलाखीची, पण सुविधा मिळेना

ओझा गाेंड समाजाची आर्थिक स्थिती हलाखीची असतानासुद्धा शासनाकडून सोयीसुविधा मिळाल्या नाहीत. त्यामुळे या समाजाची स्थिती आणखी बिकट हाेत आहे. जिल्हाबाहेर स्थलांतर करून अस्थायी व्यवसाय करून व जीवावर बेतणारे खेळ करून उपजीविका करतात, अशी व्यथा गुरूदास ताराचंद्र उईके, लवकुश मडावी, संदीप उईके, विजय उईके आदींनी मांडली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली