शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार क्विंटल धान खरेदी

By admin | Updated: December 27, 2014 01:45 IST

धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वारंवार केली होती. या मागणीची दखल घेऊन गुरूवारपासून सिरोंचा येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

सिरोंचा : धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वारंवार केली होती. या मागणीची दखल घेऊन गुरूवारपासून सिरोंचा येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सिरोंचा येथील धान खरेदी केंद्रावर पहिल्याच दिवशी एक हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. सिरोंचा तालुक्यात अंकिसा, वडधम, येथेही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतू अमरावती, रोमपल्ली येथील धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे या परिसरात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आदिवासी विकास महामंडळ नाशिक उपप्रादेशिक कार्यालय अहेरी अंतर्गत सिरोंचा तालुक्यात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र योजनेंतर्गत हलक्या प्रतीच्या धानाला प्रती क्विंटल १ हजार ३६० तर जड प्रतीच्या धानाला प्रती क्विंटल १ हजार ४०० रूपये दर ठेवण्यात आला आहे. सिरोंचा धान खरेदी केंद्रावर १ हजार क्विंटल धानाची आवक झाली. अशी माहिती संस्थेचे सचिव सुंंकरी राजन्ना यांनी दिली आहे. प्रत्येक हंगामात बारदानाचा तुटवडा असतो. परंतु यावेळी सिरोंचा केंद्रावर दोन हजार च्या आसपास बारदाना पाठविण्यात आला आहे. आणखी पाच हजार बारदान्याची आवश्यकता असल्याचे सचिवांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान खरेदी केली जात असून धानाचे पोते परिसरातील गोदामात साठवून ठेवण्याची व्यवस्था केली जात आहे.सिरोंचा तालुक्यातील खासगी व्यापाऱ्यांनीही धान खरेदी सुरू केली असून धानाला १ हजार १०० रूपये प्रती क्विंटल भाव देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खासगी व्यापारी शेतकऱ्यांना नगद स्वरूपात रक्कम देत असल्याने अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धान विक्री करीत आहेत. परंतु सिरोंचा, अंकिसा व वडधम येथे धान खरेदीला सुरूवात झाली आहे. (शहर प्रतिनिधी)