शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

चार केंद्रांवरून गौणवनौपजाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:18 IST

वनव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारचे गौणवनोपजाचे उत्पादन होत असते. या गौणवनोपज संकलन व विक्रीतून अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळत असतो.

ठळक मुद्देजिल्हाभरातून ५५ क्विंटलची आवक : उमेदतर्फे सर्वाधिक खरेदी

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारचे गौणवनोपजाचे उत्पादन होत असते. या गौणवनोपज संकलन व विक्रीतून अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळत असतो. सन २०१८-१९ च्या हंगामात केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत गौणवनौपज खरेदी योजनेअंतर्गत चार केंद्रावरून एकूण ५५ क्विंटल ८ किलो इतक्या वनोपजाची खरेदी करण्यात आली.महाराष्ट्र शासनाने विविध प्रकारच्या २६ गौणवनौपज वस्तू खरेदींसाठी प्रशासनाला मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे सदर गौणवनौपजाची खरेदी केली जाते. २०१८-१९ च्या हंगामात कुरखेडा तालुक्यातील पुराडा, आरमोरी तालुक्यातील पिंपळगाव, अहेरी तालुक्यातील मन्नेराजाराम व हालेवारा या चार केंद्रांवरून गौणवनौपजाची खरेदी करण्यात आली. पुराडाचे केंद्र उमेद तर्फे चालविण्यात आले. माविमतर्फे पिंपळगाव तर महामंडळाच्या आविका संस्थांमार्फत मन्नेराजाराम व हालेवारा या दोन केंद्रावरून गौणवनौपजाची खरेदी करण्यात आली.पुराडाच्या केंद्रावर १२ क्विंटल २५ किलो बेहडा या वनौपजाची तर पिंपळगावच्या केंद्रावर १ क्विंटल ८८ किलो एवढ्या तरोट्याची खरेदी करण्यात आली. अहेरी तालुक्याच्या मन्नेराजारामच्या केंद्रावरून १३ क्विंटल ७१ किलो बेहडा तसेच १ क्विंटल गुगुळ व दीड क्विंटल डिंकाची खरेदी करण्यात आली. हालेवाराच्या केंद्रावरून ८१ किलो हिरडा, २३.२५ क्विंटल बेहडा व १८ किलो करंज बियाणांची खरेदी करण्यात आली.माविमतर्फे २.३८ क्विंटल, उमेदच्या केंद्रावरून ३८.९९ क्विंटल व आविका संस्थेमार्फत १३.७१ अशा एकूण ५५.०८ क्विंटल गौणवनोपजाची खरेदी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून या जंगलात विविध प्रकारचे वनौपज मिळतात. यामध्ये आवळा, आंबा टोळी, करंजबी, एरंडी, चिंच बी, पांढरी मुसळी, बिबा, बेहडा, बाफडी, कडूनिंब बी, रिठा, काकडा, गुगुळ, झाडू गवत, मोहफुले, मोहाबिज आदी वनोपजांचा समावेश आहे. दुर्गम भागातील नागरिक जंगल परिसरात फिरून वनौपज गोळा करीत असतात. यातून अनेक महिला मजुरांना रोजगार प्राप्त होत असतो.१ लाख ६३ हजारांचे चुकारे अदामहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने ३८.९९ क्विंटल इतक्या हिरडा, बेहडा, गुगुळ, डिंक व करंज बी आदी वनौपजाची खरेदी करणत आली. याची किंमत १ लाख ४० हजार ४२२ रुपये आहे. आविका संस्थेमार्फत २० हजार ५६५ रुपये किमतीच्या बेहडा या वनोपजाची खरेदी करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने २.३८ क्विंटल इतकी बेहडा, तरोटा या गौणवनौपजाची खरेदी करण्यात आली असून विक्री करणाऱ्या नागरिकांना २ हजार २५४ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आली.

टॅग्स :forestजंगल